शिंदखेडा तालुक्यातील आणि दोंडाईचा लागत असलेल्या धावडे गावात ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासन ह्या
गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने घाणीमुळे साथीचे रोग पसरण्याची दाठ शक्यता तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाने ह्याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.
पावसाच्या पाण्यामुळे गावातील रस्त्यांवर पायी चालणे ही कठीण झाले आहे. त्यातच सार्वजनिक ठिकाणी, चौका-चौकात घाणीचे साम्राज्य तयार झाल्याने डास व माच्छारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या गावात साथीच्या रोगाचे प्रमाण वाढू शकते व जनतेच्या आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ग्रामसेवक ह्यांच्याकडे वेळो - वेळी तक्रार, स्मरण पत्र देऊन देखील योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत
आहे.ग्रामपंचायत प्रशसन लक्ष घालत नसल्याने वरिष्ठ पातळीवरून व जिल्हा प्रशासनाने ताबतोब लक्ष देऊन जनतेची होणारी गैरसोय दुर करावी. अशी मागणी दिनेश पाटील व मोहन पाटील ह्यांनी केली आहे.



0 Comments