Header Ads Widget

काम नाही काय करू? लुगडी फाडून दांडी करू! शिरपूर तालुका १००% दुष्काळी जाहीर करावा.


  शिरपूर तालुका १००% दुष्काळी जाहीर करावा.अशी मागणी आमदार पावरा सोबत भाजप नेत्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.एकदा, दोनदा, तिनदा आमदार झालेले आमदार सवंगड्यांना घेऊन तहसीलदार कडे मागणी करतात.कि १००%दुष्काळ जाहीर करावा. आमदारांना कदाचित माहिती नसावे का,बिचारा तहसीलदार दुष्काळ जाहीर करीत नाही. ते तर आपली राशन,रेतीमातीच्या धंद्यापुरते नोकरी करतात.तहसीलदारांना दुष्काळ जाहीर करण्याचे आधिकार तरी आहेत का? हे आमदाराला माहीत नसावे.हे शिरपूर मधील मतदारांचे दुर्भाग्य आहे.कोंबडीचे दूध काढण्याचा हा प्रकार वाटतो.
      ही बातमी चैनेल वर प्रसारित झाली. जर का,,महाराष्ट्र मंत्रीमंडळ पर्यंत पोहचवली तर बुद्धीचा दुष्काळ जाहीर करू शकतात. जर केंद्र सरकार कडे पोहचली तर कायमस्वरूपी बुद्धीचा दुष्काळ जाहीर करू शकतात.हा विषय मानसशास्त्रात पी एचडी संशोधन साठी दिला जाऊ शकतो.
     शिरपूर तालुक्यात नदीनाले खोदून जलभरण केले.त्याची सर्वत्र वाहवा झाली. याच पंदरवाड्यात आमदार अमरिश पटेल यांनी जलभरण ची पाहाणी केली.तुडुंब भरल्याचे फोटो काढून पेपर मधे झळकले.असे ढेकर येत असताना सर्व महाराष्ट्र राज्यातील लोकांनी पाहिले. आणि आता हे आमदार महोदय दुष्काळ सांगतात. पटेल खरे कि पावरा खरे? कि दोन्ही खरे?कि दोन्ही खोटे? कुछ तो गौडबंगाल है!दया,जल्दी पता करो.कुछ तो गडबड है!
      शिरपूर तालुक्यात कमी पाऊस पडला तरीही जलभरण कसे झाले?कि पाटाचे पाणी सोडून जलभरण झाले?कारण आताच आमदार अमरिश पटेल सोबत पाटबंधारे खात्याचे अभियंता पी बी पाटील सोबत शेतातील फोटो झळकले. याचे रहस्य उलगडले नाही तोवर आमदार पावरा दुष्काळ सांगतात.फक्त पंदरा दिवसात?जर दुष्काळ पडला असेल तर,बुद्धीमत्ता आणि नितीमत्तेत.एका आमदाराने जलभरणचे फोटो मिरवणे आणि दुसऱ्या आमदाराने दुष्काळ सांगणे,हे शिरपूर तालुक्यातील जनतेला खरे वाटत असेल तर नक्कीच दुष्काळ आहे.
     अनेर पाटशाखा क्रमांक २ ची पाणी वसुली करून शेतकऱ्यांना  बोगस पावत्या दिल्या जात आहेत.त्याच खात्यातील एका कर्मचारीने तशी तक्रार जळगाव जलसंपदा विभागात केली आहे.चौकशी चालू आहे.आधी पैसे कमवले.आता अब्रू घेणे चालू आहे. त्याबाबत आमदार अमरिश पटेल आणि आमदार काशीराम पावरा यांना संपूर्ण हेराफेरी माहिती असूनही वाच्यता करीत नाहीत. दोन आमदारांच्या बुडाखाली इतका अंधार आहे.त्यात शेतकऱ्यांची लुटमार होत आहे. पाटबंधारे अभियंता धड होत आहेत.वसुली परस्पर हजम होत आहे. सरकार दप्तरी वसुली दिसत नसल्याने अनेर पाट शाखा २ बंद करण्याचे सरकार चे  नियोजन आहे.पाटाचे पाणी वापर होत नाही म्हणून वसुली होत नाही.म्हणून  अनेर पाट शाखा.२ बंद पडण्याचा मार्गावर आहे.आमदार पटेल आणि आमदार पावरा यांनी याकडे जाणीवपुर्वक कानाडोळा केला आहे. याबाबत शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रश्न करणे आवश्यक आहे.अजून बुद्धीचा दुष्काळ जाहीर झाला नसेल तर!
    पाऊस कमी झाला तर दुष्काळ जाहीर करण्यासाठी कृषीमंत्री, महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री कडे मागणी करावी लागते.त्यानुसार महसूल व कृषीचे आधिकारी संयुक्तपणे पीक पाहाणी करतात.शेतावर जाऊन पंचनामा करतात. त्याचा अहवाल  महसूलमंत्री व कृषीमंत्री च्या अभिप्राय ने मुख्यमंत्री कडे सादर करतात.तेंव्हा मंत्रीमंडळ निर्णय घेते.कोणत्या तालुक्यात, जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती आहे?हे काम करण्यासाठी आमदारांनी वैधानिक भुमिका घेणे आवश्यक आहे.आणि येथे शिरपूर ला  तर वेगळेच चित्र पाहायला मिळते.लोक ही करमणूक समजून विसरून जातात. हेच आमदारांचे भाग्य!
    शिरपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. आमदार गप्प!अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही. आमदार गप्प!याबाबत आमदार पटेल आणि आमदार पावरा यांनी शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे.सहाय्यक निबंधक कार्यालयातून माहिती घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी का दिली नाही?अशी विचारणा केली पाहिजे. जेथे शेतकऱ्यांची आर्थिक अडवणुक, पिळवणूक होते,तेथे आमदार पटेल व आमदार पावरा यांनी लक्ष घालावे.असे मी जागृत नागरिक म्हणून सुचवते.जर माहिती नसेल तर आमदारांना मी माहिती पुरवते.आमदारांनी वेळ द्यावा.
    शिरपूर च्या दोन्ही आमदारांना सद्या काहीच काम नसल्याने असे कार्यक्रम घेण्यात वेळ घालवत आहेत.यालाच म्हणतात, काम नाही काय करू?लुगडी फाडून दांडी करू!

....डॉ सरोज धोंडू पाटील.
7066623818
धुळे जिल्हा जागृत जनमंच.

Post a Comment

0 Comments