भूषण अहिरे
धुळे: धुळे Dhule तालुक्यातील निमगुळ ते बाबरे रस्त्यामध्ये अक्षरशः मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्यामुळे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हेच समजेनासे झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्यावरून प्रवास करत असताना नागरिकांना बहुतेक वेळा खड्ड्यांमुळे अपघाताचा सामना करावा लागला आहे.
पुढील काही दिवसांमध्ये संबंधित प्रशासनाने रस्त्याची झालेली दुरावस्था न सुधारल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी संतप्त ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाला दिला आहे.
0 Comments