Header Ads Widget

धुळे अधिष्ठातांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; काही मिनिटच बंद होते घर

धुळे : धुळे येथील शासकिय हिरे वैद्यकिय महाविद्यालयाच्‍या अधिष्‍ठाता पल्‍लवी सापळे यांच्‍या घरी चोरी झाली. सदर प्रकार गुरूवारी दुपारी घडला असून, याबाबत उशिराने पोलिसात तक्रार दाखल झाली. (dhule-news-burglary-on-the-house-of-Dhule-medical-collage-dean)

शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पल्लवी सापळे यांचे निवासस्‍थान रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर आहे.

त्या ठिकाणी त्यांच्या आई असतात. दुपारच्यावेळी देवदर्शनासाठी त्‍या घराबाहेर गेले असता चोरट्यांनी घरी कोणीही नसल्याचा फायदा उचलत कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला व घरामध्ये असलेले लाखो रुपयांचे सोन्या- चांदीच्‍या दागिन्यांसह रोकड देखील चोरट्यांनी लंपास केली आहे.

काही मिनिटातच साधला डाव

अधिष्ठाता पल्लवी सापळे या रुग्णालयात सेवेवर होत्‍या. दुपारच्यावेळी त्यांच्या आई घरी होत्या. मात्र थोड्या वेळासाठी त्‍या घर बंद करून मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्‍या. इतक्‍याच वेळात हा सर्व प्रकार घडला आहे. दिवसाढवळ्या अशा पद्धतीने चोरट्यांकडून लाखो रुपयांचा सोन्या- चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मोहाडी पोलिस ठाण्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. व पोलिसांनी घटनास्थळी चोरीचा संपूर्ण आढावा घेत चोरट्यांचा तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments