*जनमत-*
*दोंडाईचा-* येथील दोंडाईचा-शहादा रस्त्यावरील मोतील प्लाऊड फँक्टरी समोर आज सकाळी साडे दहा वाजता राज्य परिवहन मंडळाची धुळे-बडोदा बस व ओसर्ली येथील दांपत्याची मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होत पती-पत्नी जागेवरच गंभीर जखमी होत मयत झाले आहे. याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दोंडाईचा पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की,दोंडाईचा-निमगुळ रस्त्यावर मोतील प्लाऊड फँक्टरी समोर आज सकाळी साडे दहा वाजता दोंडाईचाहून धुळे-बडोदा बस जात असताना समोरून ओसर्ली निमगुळ-दोंडाईचा कडे निघालेले दांपत्य श्री रविंद्र मुकुंदर गिरासे (वय ६०) व सौ. उजनबाई रविंद्र गिरासे (वय ५०) रा. ओसर्ली ता.जि.नंदुरबार हे दोघे पती पत्नी एम एच 0५- ए एल २६० क्रमांकांच्या दुचाकीने दवाखाना व बाजार करण्यासाठी दोंडाईचा कडे जात असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक एम एच- 20 बी एल- ४०४५ क्रमांकाची धुळे- बडोदा बस व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने सदर अपघातात दोघेही गिरासे पती पत्नी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्जुन नरोटे यांनी मृत घोषित केले आहे.
याबाबत घटनेची माहिती पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सचिन गायकवाड, दिनेश मोरे यासह पोलीस कर्मचारी पाठविले होते. याबाबत दुपारी उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


0 Comments