पाचोरा, प्रतिनिधी । नाशिक विभागात चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून पाचोऱ्यात प्रांताधिकारी म्हणून शिरपूरचे डॉ. विक्रम बांदल येणार आहेत.
नाशिक विभागातील चार उपजिल्हा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काल प्राप्त झाले असून पाचोरा उपविभागीय कार्यालयाची स्थापना झाल्यापासून सर्वात जास्त वेळ सेवा देणारे व पाचोरा - भडगाव तालुक्यातील जनतेच्या मनात घर करणारे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांची भोर (पूणे) येथे बदली झाली आहे. राजेंद्र कचरे पाटील यांचे जागी शिरपूर (धुळे) येथील उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल हे पदभार स्विकारणार आहेत.
धुळे येथील जिल्हा पुनर्वसन अधिकारी शुभांगी भारदे यांची बदली जळगांव येथील उपजिल्हाधिकारी (प्रशासन) रविंद्र भारदे यांचे रिक्त जागी झाली आहे.

0 Comments