दोंडाईचा- मागील एक महिन्यांपासुन शहरात राजपथसारख्या सतरा कोटी रूपये खर्चाच्या,शहराच्या विकासात महत्वाच्या भर घालणाऱ्या व दैनंदिन मोठ्या प्रमाणात रहदारी असलेल्या स्टेशन भाग रस्त्यावर अनधिकृत भाजीपाला-फळ लाऱ्यामुळे रहदारीस अडथळा-ट्रफीक जाम नित्यांचीच बाब झाली आहे.म्हणून आज स्टेशन भाग-राजपथ रस्त्यावर ट्रफीक जाम-गर्दी पाहून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांनी लाऱ्या हटवण्याची मोहीम राबवत,ही मोहीम त्यांनी मागील चार आठवड्यापासुन हाती घेतली आहे.त्यामुळे दुकानदारांपुढील अनधिकृत लाऱ्या हटवल्याने एकीकडे आनंदाचे वातावरण होते.तर दुसरीकडे लाऱ्यावाले उभे राहण्यासाठी हक्काची जागा प्रशासनकडे मागत होते.
स्टेशन भाग-राजपथ रस्ता म्हटला तर सर्वसामान्य नागरिकांना खरेदीसाठी व बाहेरगावी बसस्टँडमार्ग जाण्यासाठी डोकेदुखीचा रस्ता म्हटला जातो. कारण सर्वसामान्य माणूस ह्या रस्त्याने मोकळा श्वास घेऊन खरेदी व बाहेरगावी सरळ मार्ग जावू शकत नाही. त्याला विविध अडचणींचा सामना करत गर्दीतून आपला मार्ग काढत खरेदी व प्रवास सुकर करावा लागतो.ह्या रस्त्याने जो ही व्यक्ती एकवेळा जातो. तो बिगर कामाने त्या रस्त्याने जायचे नाव घेऊ शकत नाही. म्हणून हीच परिस्थिती पाहून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांनी मागील चार आठवड्यापासुन राजपथ रस्ता व स्टेशन भागातील गल्ली बोळात, दुकानांनपुढे लावलेल्या अनधिकृत लाऱ्या हटवायची मोहीम हाती घेतली व आज त्याचाच भाग म्हणून त्यांनी राजपथ रस्ता व स्टेशन भागातील बेकायदेशीर सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा-ट्रफीक जाम करणाऱ्या हात-लाऱ्या यांच्यावर कार्यवाही करत लाऱ्या हटविण्यास सांगितल्या.मात्र लाऱ्यावाल्यांनी एकजुटता दाखवत. अंत्यत कमीवेळात एकत्र येत. दोंडाईचा नगरपालिकेवर हक्काची जागा व्यवसायासाठी हवी. म्हणून निवेदन देत.प्रशासनाला धारेवर धरले.यावेळी नगरपालीकेचे मुख्याधिकारी श्री डाॅ. प्रवीण निकम यांनी नेहमीच्या गर्दी- ट्राफीक जामच्या सत्य परिस्थितीशी घुमजाव करत.आठ दिवसात सत्ताधारी गटाशी चर्चा करत कायमस्वरूपी मार्ग काढू,असे लाँऱ्यावाल्यांना आश्वाशित केले. त्यामुळे मोहीम राबविणाऱ्या पोलीस प्रशासनाचा हिरमोड झाला. तसे पाहिले तर सार्वजनिक रस्त्यावर गर्दी न होऊ देने व रहदारीसाठी अडथळा ठरणाऱ्या लाँऱ्यावर कार्यवाही करण्याचे काम नगरपालिका प्रशासनाचे आहे.पण नगरपारलीकेचा सुस्त कारभार पाहून विविध टँक्स भरणारे दुकानदार नगरपालीकेच्या दुटप्पी कारभाराने वैतागले आहे. भविष्यात ते पण एकत्र येत.दुकाने बंद करत दहा- वीस रूपये नगरपालिकेची पावती फाडत. अनधिकृत लाँऱ्या लावून व्यवसाय करतील, अशी भिती व्यापारीवर्गाकडून कायमस्वरूपी दुकानांनपुढील लाँऱ्या न काढण्याच्या दुटप्पी भुमिकेवर व्यक्त केली जात आहे. म्हणून आता नगरपालीकेनेही येणाऱ्या आठ दिवसांत लाँऱ्या वाल्यांचा कायमस्वरूपी मार्ग काढून. त्यांना भाजीपाला व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी, असा सुर आजच्या अचानक गावाच्या वातावरण अंशात झाल्याच्या भुमिकेवर सुज्ञ जनतेकडून निघत आहे.

0 Comments