शिदखेडा-- येथील 21 कोटी रुपये खर्चाच्या पाणिपुरवठा योजनेच्या कामात निकृष्ट दर्जाचे सकवद येथील ईनटेक (जॅकवेल) विहिरीचे बांधकाम, नळजोडण्यामधिल दोष याची पुन्हा चौकशी करुन दोषी आढळल्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यधिकार्यानी दिल्यामुळे आजपासुन ( दि,14) सुरु झालेले उपोषण तुर्त स्थगित करण्यात आले, महाविकास आघाडिचे नगरसेवक वंचित बहुजन आघाडी व मित्रपक्ष पदधिकार्यानी येथील नगरपंचायत प्रांगणात विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरु केले होते, संध्याकाळी मुख्यधिकारी प्रशांत बिडगर यांनी उपोषण कर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर उपोषण तुर्त स्थगित करण्यात आले,
शिदखेडा नगरपंचायतीचे विरोधी गटनेते नगरसेवक सुनील चौधरी,माजी प्रभारी नगराध्यक्ष दिपक देसले, नगरसेवक तथा प्रतोद दिपक आहिरे, नगरसेवक उदय देसले, संगिता सोनवणे, संगिता थोरात, सुमित जैन, डाॅ,ईद्रिस कुरेशी, याच्यासह महाविकास आघाडिसह ,बहुजन वंचित विविध पक्षाच्या पदधिकार्यानी उपोषण केले ,
शिदखेडा येथील पाणिपुरवठा योजनेच्या सुकवद येथील( ईनटेक) जॅकवेल विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, गावातिल मुख्य जलवाहिनिची घरगुती जोडणी एच डि पी पाईपवर एच डि पी शेड्यूलनेच केले गेले पाहिजे मात्र साध्या पि व्हि सि शेड्यूलने केली आहे, समान पाणिवाटपासाठी पितळी फेरुल न वापरता नळजोडणी केली नळजोडणी करतांना गावंढळ पद्धतिने सळई तापवुन मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून जोडणी केली गेली, या सर्व बाबी निवेदेतिल अटी व शर्तीचा भंग करुन झाल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी उपोषण केले,
शिदखेडा येथील 15 लाख रुपये खर्चाच्या गटारिचे काम निवेदेपुर्विच झाल्याने या बाबिची चौकशी करुन अज्ञात ठेकेदाराविरुथ्द पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली,
मुख्यधिकारी बिडगर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर याच्यांसमोर मागण्या मान्य केल्या, ईनटेक जॅकवेल विहिरीचे त्रयस्थ एजंसीमार्फत चौकशी करून कास्टिंग अहवाल तयार करावा, गावातिल नळजोडणी निविदाबाह्य झाली असल्यास 15/20 जोडण्या तपासाव्यात, गटारिचे बांधकाम निवेदेपुर्विच पुर्ण करणार्या अज्ञात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन बिडगर यांनी दिले, नळजोडणी सदोष आढळल्यास दोषिविरुध्द पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देण्यात आले
ह्या वेळी उपस्थित काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर माजी सभापती सुरेश देसले चंद्रकांत सोणवने समद शेख यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रविण पाटील उपाध्यक्ष मिलींद देसले रवि बापु पाटील गोलु देसले चेतन देसले तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राहुल पाटोळे देविदास चौधरी रविंद्र पाटील शाकिर कुरेशी गोलु देसले पवन देसले चेतन पाटोळे कालु मोरे राजु महाले इरफान शेख किरण थोरात दिनेश मोरे राजु थोरात
सर्व महाविकास आघाडिचे कार्यकर्ते

0 Comments