*निवडल्यावर चार-चार वर्षे गायब राहणाऱ्यांना-आता जनता आठवते,करोनाची-डेल्टापल्सची भिती नाही...*
*आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मत मिळवण्यासाठी पुढाऱ्यांचे लुभावणे पाऊल,जनतेने सावध रहावे....*
*जनमत-*
*दोंडाईचा-* सध्या दोंडाईचा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर व्हायला जवळपास दोन-तीन महिन्याच्या कालावधी बाकी आहे. तरी येथील बरीच जुनी-नवीन इच्छुक पुढारी मंडळी आतापासूनच व्युहरचना आखत जनतेच्या समोर कोणत्यान-कोणत्या कारणाने येउन ,मी तुझ्या सुख-दुख:त कसा उभा आहे,तुझ्या कामात दैनंदिन कसा येत आहे.त्यासाठी वाढदिवस,सत्यनारायण,लग्नसमारंभ, शेन्डी, घरभरणी, प्रेत यात्रा अटेंड करत. मी तुझ्या पाठीशी उभा आहे असे वारंवार भासवून आतापासूनच मतदारांवर भुरळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे नवीन भावी उमेदवार शोधण्यासाठी वार्डात प्रत्येक इच्छुकाला प्रोत्साहन देत,दाने टाकले जात आहे. म्हणून भोळ्याभाबड्या, सुज्ञ मतदारांनाही पुढाऱ्यांचा भविष्यातील मत आश्वाशित करण्यासाठीचा ट्रँप लक्षात येत असुन, आता यांना करोना-बिरोना,डेल्टापल्सची भिती काही वाटणार नाही. खुर्ची लालसापुढे कोणालाही जीव प्यारा वाटत नाही आहे. पण गरिबांना मदत करायची वेळ आली तर सर्व बिळात जावून बसतात असे मनातल्या मनात म्हणत आपल्यासारख्या भोळ्या जनतेने आतापासूनच अशा चालाक,वेळ साधू पुढाऱ्यांपासून सावध होऊन यांना वेळ आल्यावर यांची जागा दाखवायला हवी,असे जनमत सध्या उमेदवारीची भाऊगर्दी करत,नको त्याठिकाणी पुढाऱ्यांनी हजेरी लावण्याच्या परिस्थितीवर गावात उमटत आहे.
गावात तसे म्हटले तर बरेच नामाकिंत पुढारी आहे. इथे आम्हाला सर्व पुढाऱ्यांचा बाबतीत म्हणायचे नाही आहे. म्हणजे जे खरोखर समाजसेवक म्हणून गोरगरिबांसाठी आयुष्य झिजवत आहे. दिवसरात्र आपल्या कमाईतुन दहा टक्के रक्कमहिस्सा गरिब, दिन-दुबळ्या,गरजु लोकासांठी खर्च करत असतील,अशा दानशूर,निस्वार्थी समाजसेवा बजावणाऱ्या पुढाऱ्यांबद्दल तिळमात्र शंका नाही आहे. मात्र जे गरिबांच्या मतावर डोळा ठेवून,राजकीय पोळी,पद-प्रतिष्ठा प्राप्त करून, जनतेच्या पैशाचे जे विविध कर माध्यमातून नगरपालिका,शासन गोळा करते. तसेच सरकार जनतेसाठी ,शहर व गावगाव जो विकास करण्यासाठी पैशाचा माध्यमातून कोटीनी कोटी रूपयांचा विकास निधी देते .तो निधी जनतेसाठी व संबधित विकास कामासाठी सत्कार्मी न लावता फक्त थातुरमातुर,थुक लावुन काम करत आपले खिसे भरू पाहणाऱ्या भिकारचोट वुत्तीचा,व पांढरे कपडे घालून शासनाला लुटणाऱ्या वुत्तीचा जगातील कोणतीही व्यक्ती पाठराखण करणार नाही.
आज पुढाऱ्यांनकडे पाहून, त्यांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक स्टेटस पाहता कोणालाही पुढारी बनायची ईच्छा जाग्रुत होते. याचे कारणही तसेच आहे. यांचे सामाजिक, राजकीय पद-प्रतिष्ठा पावर पुढे कोणताही ड्रिग्रीवाला माणूस, गोल्डमेडलिस्ट झुकतांना पाहिल्यावर कोणालाही सहाजिकच यांच्या पावरफुल दबदबाचे साक्षात दर्शन होते. तसेच वरून हे लोक कोणत्याही सामान्य परिस्थितीतुन राजकारणात आले तर लोक यांना कोणतेही घाम गाळून श्रमाचे काम करताना पाहत नाही. उलट काही दिवसात लक्झरी लाईफ स्टाईलमध्ये जीवन जगताना पाहतात.कारण हे लोक सत्तेत जसे येतात. तसे यांच्यावर चारही बाजूंनी लक्ष्मी प्रसन्न होऊन जाते. म्हणजे यांच्या हातात जशी स्वायत्त सत्ता येते .तशा गावातील सर्व सरकारी जागा यांच्या होऊन जातात. त्या जागेच्या सरकारी फी भरून रातोरात हे गावातील हजारो चौरस फुट जागेचे मालक होऊन जातात. मग म्हणतात की, ही जागा आमची आहे. पुर्वी तर हे पुर्ण गावच आमचे होते. तसेच दैनंदिन कोणाच्या अन कोणाच्या व्यवहार,अडचण सोडवल्यास यांचे पंरसेंटेज,हिस्सा ठरलेला असतो.त्यानतर गावात अनेक बांधलेले विकासत्मक कामे बेरोजगारपर्यंत मार्गी लावण्यासाठी यांचे पंटर मार्फत दर ठरलेले असतात. म्हणजे समावसेवकच्या नावावर हे कोणतेच काम फुकट करत नाही. कोणतेही काम केले तर समोरच्याला,कार्यकर्त्याला वर्षानुवर्षे दाबून मारतात आणि विरोधक राहिला तर त्याला काम न करताच दाबून टाकतात. निवडल्यावर सतत चार वर्षे अशा पद्धतीने राजकीय पदाची पोळी शेकली जाते व गावाचा विकासाच्या नावावर आपलेच घर भरत,आपलाच भरगच्च विकास केला जातो.
आता सत्ताधारी गटाचे पाचवे वर्षे असुन ह्यावर्षी २०२१ च्या आँक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये पुढील सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम लागणार आहे.म्हणून गावात आतापासूनच लोकप्रतिनिधी, नगरसेवक बनु ईच्छुणारे नवीन, जुनी मंडळी मतदार याद्या छानन्यापासुन,नवीन व जुना मतदार कुठे कुठे टाकायचा याचे गणिते लावत,हक्काचा व सोयीचा मतदार आपल्याच जवळ ठेवत, प्रत्येक मतदाराच्या घरी सुख-दुखात,वाढदिवस, सत्यनारायण, घरभरणी,शेन्डी,लग्नकार्य,मरण- धरणात उपस्थिती लावत. तसेच त्याचे कोणत्याही कामात बळजबरीने उभे राहून सिंहाचा वाटा घेऊ इच्छितात आहे. जेणेकरून मीच तुझा वालीवारस आहे असे मतदाराला पटवून दिले जात आहे.
मात्र आता मतदार राजाही हुशार झाला आहे. त्यालाही आगामी निवडणुकीत पुढारी बनु इच्छिणाऱ्या नेतेमंडळीची मत मिळवण्यासाठीची व्युहरचना रचना लक्षात आली आहे. तसेच मागील कठीण करोना काळात कोणकोण आपल्या मदतीसाठी धावून आले,हे ही लक्षात आले आहे. म्हणून सध्या करोना रिटर्न डेल्टा पल्स आजाराने पुन्हा डोकेवर काढलेले असले तरी पुढारी-नेते मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या कोणत्याही कार्यक्रमात हजेरी लावतात आहे. तुर्तास जनताही ह्या दिखावू खेळचा मजा घेत,पुढारी-नेते सापडतील रस्त्यावर, गल्लोगल्ली असेच मजा घेत म्हणत आहे.

0 Comments