*हस्ती स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल-नँशनल ह्युमन राईट असो.जिल्हाध्यक्षा पुजा खडसे...*
*जनमत-*
*दोंडाईचा-* दोंडाईचा परिसरात गुणवत्तायुक्त शिक्षण देण्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत, हस्ती गृप ऑफ स्कूलस् दोंडाईचा येथील १५ शिक्षक-शिक्षिकांना ' शिक्षक दिन ' निमित्ताने नॅशनल वर्ल्ड वाईड ह्युमन राईटस् असोसिएशन तर्फे ' आदर्श शिक्षक ' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
सदरचा पुरस्कार वितरण सोहळा दि. ६ सप्टेंबर २०२१ सोमवार रोजी नॅशनल वर्ल्ड वाईड ह्युमन राईटस् असोसिएशन तर्फे शाळेचे मुख्य कार्यालय काराणी ज्ञानदीप येथे उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी नॅशनल वर्ल्ड वाईड ह्युमन राईटस् असोसिएशनच्या जिल्हा अध्यक्षा पूजा खडसे, संघटक प्राजक्ता बारशिंगे तसेच हस्ती स्कूल स्थानिक शालेय सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. विजय नामजोशी, उपाध्यक्षा सुगंधा जैन, शितल जैन तसेच प्राचार्य हरिकृष्ण निगम हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मार्दर्शनपर प्रास्ताविक डॉ. विजय नामजोशी यांनी केले. यात त्यांनी हस्ती गृप ऑफ स्कूलस् विद्यार्थ्यांना दर्जैदार व गुणवत्ता युक्त शिक्षण देण्यासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकासाकरिता राबवित असलेले विविध अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रम याबाबत माहिती सांगितली. यानंतर हस्ती गृप ऑफ स्कूल पूर्व प्राथमिक विभाग शिक्षिका - कांचन परदेशी, मंजुषा मोरे, मोनाली पवार, संगीता पवार तसेच प्राथमिक विभाग शिक्षिका प्रिती पाठक, गणित शिक्षक प्रविण माळी, हिंदी शिक्षक संजय मोरे, माध्यमिक विभाग इंग्रजी शिक्षक मंगलसिंग राजपूत, ज्यु. कॉलेज आयटी शिक्षक भूषण दिक्षीत, विज्ञान शिक्षक कपिल सोनवणे, संगणक विभाग प्रमुख महेश डिगराळे, क्रीडा विभाग प्रमुख प्रकाश खंडेराय, प्राथमिक विभाग समन्वयिका समीना बोहरी, समन्वयक श्रीराम मगर व उप प्राचार्या रजिया दाउदी यांना ' आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१ ' सन्मान पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
यानंतर पूजा खडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, " हस्ती स्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची यशस्वी पायाभरणीचे उत्तम कार्य हस्तीचे शिक्षक शिक्षिका निरपेक्ष भावनेने अविरतपणे करीत आहेत. " असे गौरवोद्गार काढले.
वरील ' आदर्श शिक्षक पुरस्कार ' सन्मान प्राप्त करणाऱ्या सर्व शिक्षक - शिक्षिकांचे हस्ती स्कूल शालेय समिती चेअरमन कैलास जैन, व्हा. चेअरमन दिलीप वाघेला, सचिव माधव बोधवाणी तसेच शालेय संचालक मंडळाचे मान्यवर सदस्य यांनी अभिनंदन व कौतुक केले.
वरील कार्यक्रमास हस्ती गृप ऑफ स्कूलस् चे शिक्षक - शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होते.

0 Comments