नरडाणा, १२ डिसेंबर २०२५:-- वाळू माफियांवर कारवाईचा फटका! उपविभागीय अधिकारी म. श्री. शरदजी मंडलिक सर यांच्या आदेशाने आणि तहसीलदार शिंदखेडा मा. श्री. नितीनजी देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सायंकाळी ५.३० वाजता मौजे वाघाडी बु. शिवारातील मध्य भारत कंपनी जवळ दोन अनधिकृत वाळू वाहतूक करणारे भारत बेंज कंपनीचे निळ्या रंगाचे डंपर धरले गेले. हे डंपर आजच रात्री ७ वाजता नरडाणा पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले असून, वाळू चोरांवर कडक कारवाईचा बेरड ठेवण्यात आला आहे.या धाडसी कारवाईत पथकातील कर्मचारी मंडळ अधिकारी नरडाणा स्वाती वाघ, ग्राम महसूल अधिकारी नरडाणा प्रफुल्ल मोरे, गोविंदा माळी वारूड, योगेश भिल पाष्टे, सोनल थोरात होळ, मोनाली पवार माळीच, महेंद्र पाटील जातोडे आणि अमृत शिंदे यांनी शर्थीने भाग घेतला. वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क असून, अशा गुन्ह्यांना मोकळीक मिळणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. पुढील तपास सुरू असून, गुन्हेगारांना कडक शिक्षा होईल.वाळू माफियांचा काळोख रोखण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची असून, स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अधिक तपशीलासाठी पुढील कारवाईसाठी सविनय सादर.
0 Comments