बेटावद प्रतिनिधी.
कापडणे येथे पतंग उडवण्याच्या नादात कापडणे गावात एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे येथील आदर्श कन्या हायस्कूलमधील इयत्ता सहावीचा विद्यार्थी असलेला रक्षित प्रभाकर पाटील (वय ११) याचा दुमजली घरावरून खाली पडून जागीच मृत्यू झाला
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत जाण्यापूर्वी रक्षित आपल्या मित्रांसोबत गावातील एका दुमजली घरावर पतंग उडवत होता पतंग उडवत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि घराला असलेल्या डग मध्ये तो खाली कोसळला. हा अपघात इतका गंभीर होता की, रक्षितचा जागेवरच मृत्यू झाला
या हृदयद्रावक घटनेची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती रक्षित हा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर झोपा पाटील यांचा लहान मुलगा आणि माजी सरपंच झोपा खंडू पाटील यांचा नातू होता. या दुर्दैवी अपघातामुळे कापडणे गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments