नरडाणा-- म. दि. सिसोदे कला वाणिज्य महाविद्यालय नरडाणा येथे 21सप्टेंबर आंतर राष्ट्रीय शांतता दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रम पद अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी भूषवले. वरिष्ठ प्राध्यापक प्रा. ए. के. पवार, डॉ. यू. जी पाटील उपस्थित होते या कार्यक्रमासाठी रत्नमाला सिसोदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. एस. टी. भामरे यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आले. त्यांनी आपले मार्गदर्शन करतांना उल्लेखीत केले की,21सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो कारण संपूर्ण विश्वात शांती नांदावी. अहिंसा हाच परोधर्म आहे.जगात सर्व माध्यमातून शांतीचा संदेश पोहचला पाहिजे, विश्वाने जागतिक महायुद्धचे परिणाम सोसले आहेत. हिंसा मानवतेला नष्ट करते. मानवता टिकली पाहिजे.मानवाने संघर्ष टाळून शांततेसाठी वचनबद्ध झाले पाहिजे. आतंक, गुन्हेगारी, अत्याचार याने साऱ्यांचे नुकसान होते म्हणून, शांतता संस्कृती टिकण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा केला जातो असे अमूल्य मनोगत व्यक्त केले. नरडाणा महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षेकेटतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन राष्टीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. जी. सोनवणे. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय एस. धिवरे. यशस्वी नियोजन केले

1 Comments
Very nice
ReplyDelete