Header Ads Widget

होळनांथे स्टेट बँक शाखा मॅनेजर कडून ग्राहक व शेतकऱ्यांची पिळवणूक बँक अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून नागरिकांची सामूहिक तक्रार






होळनांथे प्रतिनिधी  - शिरपूर तालुक्यातील होळनांथे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखा मॅनेजर यांच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारीत दिवसेंदिवस वाढ होत असून बँकेच्या शाखा मॅनेजरच्या मनमानी व विकृत व मनमानी कारभाराविरोधात आता गावातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सामुहिक तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वीच भर दिवसा सर्वर बंद असल्याचे कारण देत बँकेचे दरवाजे बंद केले याबाबत वर्तमानपत्रातून बातम्या आल्या होत्या .मात्र तरीदेखील बँक अधिकाऱ्यांची मुजोरी काही केल्या कमी होत नसून त्यांच्या विकृत मानसिकतेला व  वागण्याला कंटाळून परिसरातील सर्व बँक खातेधारक, कर्जदार व बचत गट महिला व्यापारी वर्ग व शेतकरी व सरपंच यांनी जिल्हाधिकारी धुळे यांना व व इतर विभागांना सामूहिक तक्रार दिली आहे.

सदरच्‍या तक्रारीत गावकऱ्यांनी असे नमूद केले आहे गावातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा मॅनेजर यांच्या बाबतीत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी अनेक दिवसांपासून समोर येत असून किरकोड तांत्रिक बाबी म्हणून सुरुवातीस त्याकडे दुर्लक्ष केले गेले ,मात्र दिवसेंदिवस नागरिकांच्या वाढणाऱ्या तक्रारी व शाखाधिकारी यांची मनमानी वागणूक व विकृत मानसिक प्रवृत्ती त्यातून प्रत्येक ग्राहकाशी उद्धट व अशोभनीय वागणूक इत्यादी बाबत परिसरातील बँक ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे आणि त्यामुळे बँकेबद्दल असंतोष वाढत आहे.
चत खाते धारक व्यवसायिक महिला बचत गट कर्ज धारक विद्यार्थ्यांना देवाण-घेवाण याच्या व्यवहारासाठी पूर्ण दिवस म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत लाइनीत उभे करून त्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळ केला जात आहे ,सदर बँकेची कनेक्टिविटी बंद आहे याचे कारण देत वारंवार बँकेचा कारभार पूर्ण दिवस बंद ठेवण्यात येतो , शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात तरी देखील कर्ज मंजुरी चे काम होत नाही., शासनाने दिलेल्या पीक कर्जाच्या क्षमता इतका कर्जपुरवठा बँक अधिकारी करत नाही, सर्व कागदपत्र योग्य असून सुद्धा त्रुटी काढून कर्जदाराला करण्यासाठी प्रकरणे नाकारण्यात येतात, शिवाय पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना एस बीआय लाइफ या विमा ची सक्ती केली जाते जे लोक विमा घेतात त्यांची कामे होतात विमा न  घेणाऱ्यांची कामे केली जात नाहीत .व प्रकरण नामंजूर केले जाते कर्जाची पूर्ण परतफेड करून देखील ना हरकत दाखला देत देण्यात येत नाही परिणामी ग्राहकांना बोजा कमी कर कमी करणे कामात अडचणी निर्माण होतात. बँकेमार्फत थकीत कर्जासाठी ओटीएस योजना जाहीर होते पण त्याची माहिती ग्राहकांना दिली जात नाही, बँकेच्या कामकाजासाठी के.वाय.सी. कागदपत्र वारंवार जमा करून देखील नोंद घेतली जात नाही. प्रत्येक बँकेला तक्रार पुस्तक ठेवणे बंधनकारक आहे मात्र अशी कोणतीही व्यवस्था या शाखेत केलेली नाही इत्यादी बाबतीत नागरिकांनी लेखी स्वरूपात तक्रार केली असून याबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घेत बँकेच्या कारभारात सुधारणा आणावी व नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात आणि सदर शाखा अधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. याबाबत  आमच्या प्रतिनिधींशी बोलताना नागरिकांनी आज पर्यंत गावाच्या इतिहासात बँकेत इतका मुजोर अधिकारी आलेला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे जर प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही केली नाही तर नागरिकांना पुढे येऊन बँकेला टाळे ठोकावे लागेल व बँक प्रशासनाच्या निषेध करावा लागेल असे मत व्यक्त केले आहे. सदरच्या निवेदनावर अनेक बँक ग्राहक बचत गट शेतकरी सरपंच व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments