Header Ads Widget

नरडाणा येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस





     नरडाणा--  म. दि.सिसोदे कला वाणिज्य महाविद्यालय येथे 24 सप्टेंबर राष्ट्रीय स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी स्वीकारले. यावेळी व्यासपीठावर माजी कार्यक्रम अधिकारी एम. जे मासुळे व वरिष्ट प्राध्यापक एन वाय खैरनार हे होते.
    राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. जी. सोनवणे यांनी एन. एस. एस ची स्थापना त्याची कार्य,उद्देश, कार्यप्रणाली विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून त्यात श्रमाचे बीज रोवले जाते, सामाजिक कार्य करत असतांना देशाचे देखील कार्य केले जाते. राष्टीय भावना जोपासली जाते. विध्यार्थी मित्रांचा सर्वांगीण विकास होतो. त्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण बाहेर येतात विद्यार्थी सर्वगुण संपन्न होतो राष्टीय हिताची ही चळवळ आहे.विभिन्न संस्कार रुजवले जातात. भारताची नवपिढी निर्माण केली जाते. व्यक्तिमत्व विकास, सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय मूल्य अंगीकृत होऊन यु्वकांना नव दिशा दिली जाते असे आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले. नरडाणा महाविद्यालयाचे अध्यक्ष संजयकुमार सिसोदे यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय . एस धिवरे  यांनी सुयोग्य नियोजन केले

Post a Comment

0 Comments