पाष्टे गावातील साने गुरुजी विध्यालय व श्रीपाद चव्हाण बाबा कनिष्ठ महाविद्यालय मार्फत शाळेच्या आवारात कोरोना योध्दा सत्कार समारंभ करण्यात आला त्या वेळेच्या क्षणी
घेण्यात आला व १०वी व१२ वी च्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
🙏🏻 धन्यवाद आबासाहेब आपण कोरोना योद्धा यांचा सत्कार करून स्व. आप्पासाहेब यांच्या दातृत्वाच्या संस्काराचे दर्शन घडवून दिले, कारण स्व. आप्पासाहेब हे नेहमीच चांगल्या केलेल्या
कार्याची दखल घेत असत. आणि पाठीवर शाब्बासकीची थाप देऊन अधिक चांगले कार्य
करण्याची प्रेरणा देत असत.
आप्पासाहेबांचे एक वाक्य असायचे की, चांगले कार्य करण्यासाठी
प्रोत्साहन देणे ही एक प्रत्येक मानवाचीजबाबदारी
आहे. ती जबाबदारी आपण आपल्या या कार्यातून दाखवून दिली.
आज कोरोना योद्धा म्हणून ज्यांचा सत्कार करण्यात आला त्यात
*डॉ. गुलाबराव ज्ञानेश्वर पाटील ( महाजन )*
यांच्या कार्याची मांडणी शब्दात होऊ शकत नाही, कारण दादा बेटावद केंद्राला होते म्हणून आपले
पाष्टे गाव आणि परिसर सुरक्षित राहिले. नाहीतर ज्या परिस्थितीतून गाव गेले त्याच्या पेक्षा भयंकर परिस्थिती राहिली असती. कारण मी स्वतः दादांचा
खूप जवळून अनुभव घेतलेला आहे. दादा स्वतः जेव्हा या कोरोनाच्या कचाट्यात सापडले होते तरीही स्वतःचा जनसेवा हा धर्म त्यांनी सोडला नाही कर्तव्यावर असलेल्या ठिकाणीच स्वतः काँरनटाईन राहून आपल्या मार्गदर्शनाने रुग्णसेवा करत राहिले, दादांच्या बाबतीत मी एकच सांगेल की,
*जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारा.*
नंतर सत्कार झालेले *डॉ. महाले नरडाणा* यांच्या बाबतीत काय सांगायचे त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना बघितल्या बरोबर रुग्ण अर्धा बरा होऊन जातो.
त्यानंतर आपल्या गावाचा सुपुत्र *श्री. निलेश गोकुळ लोहार* ज्याचा परिवाराला, गावाला,
तालुक्याला ,जिल्ह्याला नाही तर पूर्ण महाराष्ट्राला स्वाभिमान वाटावा असे कार्य त्याने केलेले आहे.
नंतर ज्यांचा सत्कार करण्यात आला ते आपल्या गावात ज्याला विठ्या म्हणायचे परंतु त्याने असे काही कार्य केले की, विठ्या विठ्या न राहता विठ्ठलराव झाला. म्हणून माणसाने असे काही कार्य करावे की आपल्याला
आपल्या करण्यावर ओळखले गेले पाहिजे.
नंतर डॉ. भरत पाटील यांनी खऱ्या अर्थाने आपल्या कार्याची छाप पाडली आहे. कारण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जेव्हा काही डॉक्टर घरीच बसून होते तेव्हा डॉ. भरत यांनी आपल्या गावातील रुग्णांना जास्तीत जास्त सेवा देण्याचे काम केले.
नंतर डॉ. चौधरी यांचे पण कार्य खूपच वाखान्या जोगे होते कारण चौधरी नाना नेहमी प्रत्येकाला अगदी पोट तिडकीने कोरोना विषयी मार्गदर्शन करत होते आणि सांगत होते की, घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे
आणि नंतर ज्या सर्व आशा वर्करांचा सत्कार झाला त्यांच्या विषयी एकच सांगेल त्यांच्या
नावातच आशा आहे आणि त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त आशा पूर्ण करून आपल्या कामाची पावती आज घेतली. तसेच आपल्या शाळेतील शिक्षक ज्यांचा वास्तविक या कार्याशी दूरदूर पर्यंत काही संबंध नव्हता तरी त्यांनी आशा वर्कर, भावना पाटील,चंद्रकला पाटील,आशा शिरसाठ, मंगला कोळी यांच्या सोबत जाऊन कार्य केले.
वरील सर्वांचे संपादक सा सुजान नागरिक पाष्टे परिवाराच्या वतीने 💐हार्दिक अभिनंदन💐 करतो.
आणि या सर्वांच्या कार्याची दखल आबासाहेब श्रीराम जवागे, व मुख्याद्यापक व शिक्षक, कर्मचारी वर्ग यांनी घेतली. त्यांचा यथोचित सन्मान करून सत्कार केला. आणि आपले गावाप्रति असेल दातृत्व भावनेचे दर्शन आज घडले. आपले सुद्धा खूप खूप 💐हार्दिक अभिनंदन💐 करतो.
मनोगत-- श्रीराम जवागे, ललीत वारुडे, नथु महाजन,कोठावदे, मुख्याद्यापक श्रीमती पी एस पाटील यांनी केले
सुत्रसंचालन-- वाय एस सनेर, पी एस जाधव, आभार--एस एल पाटील यांनी केले
आणि माझ्या शब्द वाणीला पूर्ण विराम देतो,
🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻











0 Comments