*व्यापार-व्यवसायातुन प्रगती साधत हाँटेल अजय पँलेसचे मालक यांची समाजसेवेकडे वाटचाल...*
*येणाऱ्या नगरपालीका निवडणुकीत इच्छुक उमेदवार असल्याने अनेकांना धडकी वर्रेसेस पटकी देणार-पिंटू महाजन उर्फ दिनेश भाऊ महाजन...*
*जनमत-*
*दोंडाईचा-* शहरातील सरल- निर्गवी व हरहुन्नरी, दिवसेंदिवस सामाजिक- व्यवसायिक प्रगती साधणारे एक व्यक्तीमत्व म्हणजे ज्यांचे नाव घ्यावेसे वाटते.ते म्हणजे हाँटेल अजय पँलेसच मालक पिंटु भाऊ उर्फ दिनेश भाऊ महाजन हे होय. आज त्यांच्या कार्याची केन्द्रीय मानवधिकार संघटनेने दखल घेत. उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करून खऱ्या अर्थाने समाजातील उपेक्षित वर्गाला न्याय दिला आहे. म्हणून येणाऱ्या काळात खान्देशातील कोणीही व्यक्ती- पिडीत न्यायापासुन वंचित राहणार नाही, असे कोणीही पिंटुभाऊंच्या आजपर्यंतच्या कार्यप्रणालीकडे पाहून सहज म्हणू शकतो. त्यांच्या ह्या उत्तुंगभरारी निवडीबद्दल जनमतने सहज त्यांच्यांशी येणाऱ्या सामाजिक-राजकीय वाटचालीबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता,पिंटुभाऊ यांनी सांगितले की, माझा जन्म एकदम सामान्य कुंटूबात झाला आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात जसे चढ-उतार येतात. तसेच आजपर्यंत आपण जीवनात संघर्ष करत व्यवसायिक,सामाजिक, राजकीय प्रगती केली आहे. आजतागायत आपण कुणालाही न दुखावता. राजकीय क्षेत्रात किंग न बनता,किंगमेकर म्हणुन भुमिका घेतली आहे. मात्र आता काही चुकीच्या लोकांच्या वर्तुणक व कामाच्या पद्धतीमुळे नुसते किंगमेकर म्हणुन चालणार नाही आहे. तर उलट आता स्वतः च किंग बनावे लागणार आहे. तरच तळागाळातील, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आपण सोडवू शकू.आज केन्द्रीय मानवधिकार संघटनेनेपण आपले समाजातील, सर्वसामान्य लोकांसाठी झटण्याची व त्यांचे प्रश्न सोडवण्याची कसब पाहून संघटनेचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पद बहाल केले आहे. मी ही पदाला साजेसे असे कार्य करून समाजातील शेवटच्या टोकापर्यंत कोणावरही अन्याय, अत्याचार झाला असेल तर त्याला मानवधिकार संघटनेमार्फत न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तरच जीवन सार्थ झाल्याचे समजू असेही त्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या २०२१/२०२२ च्या गावातील दोंडाईचा-वरवाडे सार्वत्रिक नगरपालीका निवडणुकीत उमेदवारी करून, लोकांमधुन निवडुन येण्यासाठी सर्वपरी तयारी केली आहे. म्हणून विरोधकांना नुसती आतापासून धडकीच नाही पटकी द्यायची पण पुर्ण तयारी केली आहे,असेही शेवटी त्यांनी सांगितले.
त्यांच्या ह्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षाचे माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख, ज्ञानोपासक शिक्षण मंडळीचे अध्यक्ष व दोंडाईचा-वरवाडे नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष डॉ. बापूसाहेब रविंद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष प्रदीपभाऊ वाणी, राजू देशमुख उर्फ जाँबाज, कय्युम पठाण, माजी सैनिक युसूफ खाटीक, बिलाल बागवान, रईस बागवान, नगरसेवक नरेंद्र गिरासे, नगरसेवक रविभाऊ जाधव, नगरसेवक छोटुभाऊ मराठे, नगरसेवक राजूभाऊ जाधव, रवि पाटील, मुन्ना खाटीक,गणेश चकणे,आबा चित्ते आदींनी अभिनंदन करत,भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

0 Comments