पाष्टे-- गावातील वारंवार रात्री बेरात्री खंडीत होणारा विज पुरवढा सुरळीत करण्यात यावा . तसेच नरडाणा बेटाबद व वारुळ या गावातील विद्युत पुरवठा नियमीत सुरू असतो मग पाष्टे म्हळसर मुडावद या तीन्ही गावांचाच वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येतो .यापुर्वी वेटावद नरडाणा येथील कार्यालयात लेखी व तोंडी सुचना दिलेल्या आहेत . असे असतांना विद्युत पुरवठा सुरळीत करणेबाबत काहीही कार्यवाही केली जात नाही .
१)या कारणामुळे पाष्टे गाव हे पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्येचे गाव असुन सतत विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे गामस्थांना पिण्याच्या पाण्याबाबत मोटया गैरसोयीला सामोरे जावे लागते . पाष्टे गावाची पाणी पुरवठा योजना ही मुडावद येथुन आहे . अनियमित विजपुरवटामुळे पाणी पुरवठा निश्चित वेळेत किंवा ठरलेल्या वेळेत होत नाही .
२) पाष्टे येथील डिपीच्या पोलवर तीन विभागाचे वितरण केले जाते तरी त्या पेटी (फ्युजबॉक) उघडयावर आहे . सदरचे फ्युजबॉक्स जमीनीपासुन एक ते दिड फुटावर आहेत . सदर डिपीला कुठेही तारेचे कुंपन केलेले नाही . सदर डिपीच्या बाजुला सार्वजनिक महिलांचा
सौचालय आहे . रात्री बेरात्री महिला मोश्चात्नयासाठी तिथे जातात . त्यामुळे भविष्यात मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी डिपीस संरक्षण कुंपन तयार करण्यात यावे.
पाष्टे गावातील स्ट्रीट लाईच्या अल्युमिनीअम तारा पुर्ण जिर्णावस्थेत झाले आहेत. तसेच इंदिरा नगर जुना प्लॉट जुने गाव येथिन तारा हया कधीपण तुटुन जिवीत हानी होऊ शकते .तरी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे . गावातील काही पोलवरील तारा हया ठिकठिकाणी खाली लांबल्या आहेत .शेतकरी त्यांचा शेतमाल वाहतुक करतांना बैलगाडे अथवा ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो . सदर तारा हया खाली लांबल्याने भविष्यात मोटा अनर्थ घडु शकतो .
8) गेल्या काही वषापुर्वी विद्युतपुरवटा नरडाणा येथुन केला जात होता म्हणुन पाष्टे गावासाठी
वारंवार बिज खंडीत करण्याची परिस्थिती होत नव्हती . मात्र सदर पाष्टे गावाचा विद्युत पुरवटा
बेटावर वरून सुरू असल्याने गेल्या तीन चार वर्षापासुन गामस्थांना वारंवार विजपुरवठा खंडीत
होणा-या संकटास गामस्थांना तोंड दयावे लागत आहे . तसेच कधी कधी तर पुर्ण रात्र विद्युत पुरवठा बंद केला जातो . सदर विद्युत पुरवठा नियमीत करण्यासाठी कर्मचारी टाळाटाळ करतात फोन स्विकारले जात नाही . फोन स्विकारलास अरेरावीची भाषा वापरतात . तसेच पाष्टे हे मोठया
लोकसंख्येचे गाव असुन विज वितरण कंपनीने नियमीत वायरमनची देखभालीची नेमणुक केलेली आहे.
मात्र सदर वायरमन हा पाष्टे येथे कायस्वरूपी वास्तव्यास नाही. त्यामुळे छोटया मोठया तक्रारीबाबत बेटावद कार्याल्यासी संपर्क केला जातो . तेव्हा अधिकारी कर्मचारी हे अरेरावी व उडउडवीची उत्तरे देतात . त्यामुळे वेळेवर विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही . तरी सदर वायरमन यांना पाष्टे येथे राहणेबाबत सक्त सुचना देण्यात यावी.
सदरचा वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास पाष्टे ग्रामस्थ
आपल्या कार्यालयावर मोर्चा काढतील याची नोंद घ्यावी .आणि एकही ग्रामस्थ विजबिल भरणार
नाहीत .काही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्याल्याची
राहील .याची गंभीर स्वरूपाची नोंद घ्यावी
.प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी
मा . नामदार उध्दवीजी ठाकरे . मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ३२, मा नितीनजी राऊत ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई .
मा .सचिव ऊर्जा विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई . मा.जिल्हाधिकारी धुळे.
मा. जिल्हा पोलिस अधिक्षक धुळे ता. जि.धुळे
मा - उपविभागीय अधिकारी (प्रांतसाहेब)शिरपुर ता . शिरपुर जि.धुळे .
मा . अधिक्षक अभियंता महावितरण कंपनी धुळे जिल्हा धुळे .
मा .कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी धुळे जिल्हा धुळे .
मा .शामकांतजी सनेर, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष जि.धुळे.
मा .शिवसेना जिल्हाध्यक्ष - ता .जि .धुळे
मा . राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष धुळे .
मा . तहसिलदार शिंदखेडा, ता. शिंदखेडा जि.धुळे.
मा . सहाय्यक पोलिस निरिक्षक, नरडाणा पोलिस स्टेशन . ता .शिंदखेडा जि.धुळे यांना निवेदन देण्यात आले आहे

0 Comments