*जनमत-*
*दोंडाईचा-* मुंबई शिवडी येथे ट्रेडिंग कंपनी चालविणाऱ्या चार भागीदारांना साक्री येथील दहा ते बारा लोकांनी सुझलाँन कंपनीची तांब्याची ट्रक भरून माल देण्याच्या बहाण्याने झांडाच्या दाट वस्तीत नेऊन आठ लाखात लुटून नेण्याची घटना नुकतीच झाली होती. मात्र आज दोंडाईचा पोलीस स्टेशनला लुटीची तक्रार द्यायला आलेल्या फिर्यादीला पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांनी फिर्याद ऐकल्यावर दोन तासातच न्याय दिल्याने फिर्यादीने समाधान व्यक्त केले आहे. सदर गुन्ह्यात दोंडाईचा पोलिसांनी वापरण्यात आलेले वाहन व दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत फिर्यादी श्री विक्रम रमेश पवार (वय-३६) रा.शिवडी,मुंबई यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात जनमत-ला दिलेली माहिती अशी की, आम्ही चार भागीदार मिळून मुंबई येथे विविध कंपन्यांना कच्चा व जुना रिसायकल माल सप्लाय करतो.म्हणून आम्हाला शेखर भोसले नामक व्यक्तीने आँनलाईन संपर्क करून फोटो पाठवत सुझलाँन कंपनीची (काँपर वायर) तांब्याची तार विक्री करायची आहे, असे सांगितले. तेव्हा आम्ही सांगितले की, मेल व वाट्सप वर फोटो पाठवून आम्ही व्यवहार करू शकत नाही. तेव्हा त्यांनी आम्हाला कंपनीचा अजय नामक मँनेजर यांच्याशी बोलणे करून सांगितले की,तुम्ही दोंडाईचा येथे या. तेथे तुम्हाला आमचा माणूस घ्यायला येईल. त्यानुसार दिनांक ३ आँक्टोबर रविवार रोजी आम्ही दोंडाईचा येथे चारही भागीदार आलो. तेथे आम्हाला दोन लोक घ्यायला आले. त्यानंतर ते आम्हाला निजामपुर साक्री येथे घेऊन गेले.ताब्याची बाईट दाखवली. तसेच आमच्यात ३५०/रूपये बाईट प्रमाणे दहा टन माल रितसर पावतीने खरेदी करायचा व्यवहार झाला व दहा टक्के रक्कम जागेवर व उर्वरित माल पोहच केल्यावरची भाषा झाली. मग दोन दिवसांनी आम्ही रोख रक्कम घेऊन पुन्हा दोंडाईचा येथे आलो व रेल्वे स्टेशन जवळीक हाँटेल गोपाल लाँज येथे रूम भाड्याने घेतला.याठिकाणी परत आम्हाला घ्यायला कंपनीचे दोन लोक आले. त्यांनी आम्हाला रिक्षा भाड्याने करायला सागिंतली. तेव्हा आम्ही रिक्षा भाड्याने करून गेलो असता.खोरीटिटाने ता.निजामपुर गावाजवळ वीस नंबरच्या पोल जवळ रिक्षावाल्याने सोडले.तेथुन कंपनीचे लोक मोटरसायकल बसवून झाडांच्या दाट वस्तीत घेऊन गेले.तेथे अगोदरच आठ ते दहा लोक होते. त्यांनी तेथे उतरताच आम्हाला मारझोड करायला सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी बँगेत आणलेले चार लाख रोख, दोन तोळ्याची चैन,दीड तोळ्याचे लाँकेट,पाच ग्रँमची सोन्याची अंगटी,एक चांदीची अंगटी वजन माहित नाही, हातातील पस्तीस हजाराची घड्याळ, पाकीट,जँकेट,गाँगल,मोबाईल, परफ्युम आदी आठ लाखा पर्यंतचे साहित्य, रोख रक्कम, सोने लुटले व लामकनी, ता.धुळे ह्या गावी जीवे ठार मारण्याची धमकी देत सोडले.म्हणून आम्ही घाबरून परत मुंबई येथे गेलो.
मात्र आज दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आलो असता,दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी साहेब यांनी तक्रार ऐकून घेत,पुढील तपासासाठी पोलीसांसोबत मला पाठवून लगेच लाँज मालक, वाहन चालक यांना बोलवत आम्ही आल्याची खात्री करत,घटनाक्रम जाणुन घेतला व जामदे ता.साक्री येथुन संशयित हितेश प्रजा चव्हाण (वय२३) व शक्तीविरू झिंगा पवार(वय२९) ह्या दोन जणांना तक्रारकर्त्याच्या ओळखीवरून ताब्यात घेतले.उर्वरित आरोपींच्या मागावर पोलीस आहेत.तसेच उर्वरित घटना निजामपुर साक्री हद्दीत असल्याने तेथील पोलिसांनाही कळवण्यात आले आहे.
सदर लुटीचा प्रकार उजेडात आणण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री दुर्गेश तिवारी यांच्या सोबत पोलीस काँन्सटेबल राकेश खांडेकर, संदीप कदम, योगेश पाटील, प्रविण धनगर,राजेंद्र सोनवणे आदींनी मेहनत घेतली आहे. तसेच तक्रार ऐकताच तिवारी साहेबांनी लुटारूंच्या मुसक्या आवळल्याने फिर्यादी सुखावला असुन,गावात त्यांच्या ह्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

0 Comments