नरडाणा बेटावद येथून वारुड कडे येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने शिंदखेडा तालुक्यातील जातोडे येथील माजी उपसरपंच भीला रहेमान पटेल (५५) रा जातोडा ता शिंदखेडा हे जागीच ठार झाले. या संदर्भात नरडाणा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनाने विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि मनोज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पी एस आय शरद पाटील करीत आहेत. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की काल संध्याकाळी धरणगाव येथून बेटावर मार्गे जातोडा येथे आपल्या दुचाकी क्र एम एच १८ ए आर ०८२१ जात असताना भीला रहेमान पटेल (५५) यांना एका अज्ञात वाहनाने जोराने धडक दिल्याने पटेल हे जागीच ठार झालेत. विद्यमान जि. प. सदस्य ललित वारुळे यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत त्यांना स्वतःच्या वाहनाने नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. आरोग्य केंद्रातील अधिकारी डॉ मलिक यांनी त्यांना मृत घोषित केले. ते जातोडा येथील माजी उपसरपंच होते. गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेना या पक्षाचे ते जातोडा येतील शाखा प्रमुख होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. मोठ्या मुलाच्या अकस्मात मृत्यू नंतर त्याच्या तीन मुलांची व सुनेची जबाबदारी पटेल यांच्यावर होती. पटेल हे शेतकरी होते. व त्यांचा दुधाचा व्यवसाय होता. त्यांच्या निधनाने नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काल प्रचंड गर्दी गोळा झाली होती त्यात बेटावद येथील जि. प. सदस्य ललित वारुळे माजी जि. प. सदस्य मंगेश पवार शिवसेनेचे तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील नरडाणा येथील माजी पं. स. सभापति लीलाधर पाटील, डॉ. नितीन चौधरी, माजी उपसरपंच अनिल सिसोदे, महेंद्र सिसोदे, अशोक पाटील, हिरालाल बोरसे, जातोडा येथील माजी सरपंच हमिद पटेल, मकसूद पटेल, पंकज सोनवणे, देविदास माळी, गोलू सोनार, सागर कोळी, अजय भामरे. आदींसह विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित होते. आज दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

0 Comments