Header Ads Widget

*केंद्रीय मंत्र्यांचे आगमन होत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण कामाला लागले*


      दोंडाईचा शहादा रस्त्याची दुरावस्था, सोनगीर दोंडाईच्या रस्त्याची दुरावस्था बाबत सामाजिक संस्थांनी तसेच पत्रकारांनी आंदोलने केली पाठपुरावा केले. परंतु सुस्त प्रशासन कानाडोळा करीत होते की काय असा प्रश्न उपस्थित होत होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे बोट दाखवत होती तर राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभाग केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रस्त्याच्या कामाविषयी सांगत होती या भानगडीत रस्त्याचे काम होत नव्हते.  उशिरा का होईना दोंडाईचा  शिंदखेडा मतदार संघाचे आमदार जयकुमार  रावल यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला म्हणून की काय झोपी गेलेले प्रशासन जागे झाले आणि डांबरीकरणाच्या कामास सुरुवात झाली.
       अनेक सामाजिक संस्थांनी, पत्रकारांनी पुलाच्या व रस्त्याच्या दुरावस्था बाबत आंदोलनं केली, रकानेच्या रकाने भरून बातम्या छापल्या परंतु सुस्तावलेले अधिकारी हे रस्ता दुरुस्त करण्याचे नाव घेत नव्हते परंतु उशिरा का होईना डांबरीकरणाच्या कामास सुरुवात झाली असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. परंतु या सोबत डांबरीकरणाचा दर्जा, रस्त्याच्या कामाचा दर्जा उत्तम असावा अशी देखील वाहनधारक व जनतेकडून  अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या रस्त्यांची दयनीय अवस्था बाबत अनेक महिन्यापासून वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता हेच समजत नव्हते. अशा दयनीय अवस्थेत मार्गक्रमण करावे लागत होती. उशिरा का होईना रस्ता आणि पुलाच्या डागडुजी कामास सुरुवात झाली असून कामे  दर्जेदार झाली पाहिजे, गुणवत्तापूर्वक झाली पाहिजे ठेकेदारांनी कामे चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे.अशी  जनतेची अपेक्षा आहे. संबंधित महामार्ग हा राज्य महामार्ग क्रमांक एकचा मार्ग होता. हा मार्ग राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश राज्यांना जोडणारा मार्ग म्हणून ओळखला जात होता. हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्याने याची देखभाल दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. अनेक दिवसापासून केंद्र सरकारच्या या मार्गाकडे संबंधित विभागाचे साफ दुर्लक्ष होते असे दिसून आले. परंतु दोंडाईचा नगरपालिकेच्या कार्यक्रमाच्या उद्घघाटना निमित्त केंद्रीय मंत्री यांचे दोंडाईच्या शहरातआगमन होणार आहे म्हणून की काय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जागे होऊन कामाला लागले असे चित्र निर्माण झाले आहे.  अनेक महिन्यापासून भारतीय जनता पार्टी , काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना मागणी करत होती, पत्रकार जनतेच्या होत असलेला हालअपेष्टा मांडत होती. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे टोलवा टोलवीची उत्तरे देऊन काम करण्यास टाळाटाळ करीत  होते. परंतु दोंडाईचा नगरपालिकांच्या विकास कामांच्या उद्घघाटनानिमित्त केंद्रीय मंत्री  येणार म्हणून की काय रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात झाली. रस्ता हा दर्जेदार, उत्तम व्हायला हवा. नाहीतर केंद्रीय मंत्री गेले आणि रस्त्यांना खड्डे पडले असे होता कामा नये अशी समस्त जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केंद्रीय मंत्री जर लवकर आले असते तर इतकी महिने वाहनधारकांना, नागरिकांना रस्त्यातील खड्ड्याच्या त्रासांना सामोरे जावे लागले नसते.  केंद्रीय मंत्र्यांना पाच सहा महिने अगोदर जर दोंडाईचा नगरपालिकेच्या कार्यक्रमाच्या उद्घघाटनाला आणले गेले असते तर मोठ्या पुलाची व रस्त्याची काम कधीच झाले असते असे समस्त जनतेला वाटायला लागले आहे. दर महिन्याला केंद्रीय मंत्र्यांना आणावे अशी मागणी आमदार जयकुमार रावल यांच्या कडे करण्यात येणार असल्याचे जनतेकडून बोलले जात आहे. कारण  केंद्रीय मंत्री आलेत तर खड्डे दुरुस्ती व रस्ता दुरुस्तीचे  कामे मार्गी लागतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री दोंडाईच्या शहरात येणार त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कामाला लागले आहे. .राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उशिरा का होईना कामाला लागल्याने जनतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
       
        *राकेश प्रल्हाद पाटील*

Post a Comment

0 Comments