धुळे - आजच्या हिवाळी अधिवेशनात धुळ्याचे आमदार कुणाल पाटील यांची विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. आजपासून महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. हे अधिवेशन 22 ते 28 डिसेंबर या दरम्यान होणार आहे. आजच्या पहिल्याच दिवशी आमदार कुणाल पाटील यांनी तालिका अध्यक्ष पदी बाजी मारली आहे. कॉँग्रेसचे आमदार कुणाल रोहिदास पाटील हे धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे निवडून आलेले आहेत. ते महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून आले आहेत. आणि यंदा त्यांची निवड विधानसभेचे तालिका अध्यक्ष म्हणून झाली आहे. एप्रिल 2021 मध्ये त्यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. आता त्यांनी 2021 मध्येच विधानसभेचे तालिका अध्यक्ष पदावर आपली जागा बनवली आहे. त्यांच्या या कामगिरीचे विशेष कौतुक होणार आहे.
0 Comments