Header Ads Widget

*पशुसंवर्धन विभाग , जिल्हा अग्रणी बँक व मंगल गोशाळा आयोजित किसान क्रेडिट कार्ड योजना शिबीर उत्साहात संपन्न*


नरडाणा : धुळे जिल्ह्यातील पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, व मत्स्यपालन शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना अंमलबजावणी शिबिराचे मंगल गोशाळा शाखा साकवे येथे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आदर्श दुध उत्पादकांचा सत्कार सोहळाही पार पाडण्यात आला. पंचक्रोशीतील आदर्श शेळीपालन,कुक्कुटपालन ,मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला. सदरहू कार्यक्रमाला जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक मनोजकुमार दास, नाबार्ड बँकेचे व्यवस्थापक विवेक पाटील, सेंट्रल बँक ऑफ इंडिया दोंडाईचा कृषी अधिकारी खुशाल आहेर, भारतीय स्टेट बँकेचे शिंदखेडा कृषी अधिकारी संदिप देवरे, युनियन बँक ऑफ इंडिया कृषी अधिकारी प्रशांत कांगुणे, मंगल गोशाळेचे अध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत,
सेवानिवृत्त कृषी अधिकारी एस.एल.गिरासे, डॉ.भरत बोरसे, अमराळे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ.भरत
देसले आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा बँक प्रबंधक मनोजकुमार दास म्हणाले की, शेळीपालक, कुक्कुटपालन, मत्स्यपालन व दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने किसान क्रेडिट कार्ड हि
अभिनव योजना आणली आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होणार आहे. परंतू शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड करावे जेणेकरून बँकांना आर्थिक पतपुरवठा करण्यात मदत होणार आहे. पिक कर्ज हि वेगळी योजना असून किसान क्रेडिट कार्ड हि नवीन योजना आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बँकेने पात्र शेतकऱ्यांना विना अडथळा किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ द्यावा. यापुढे
प्रत्येक गावात बँकांनी डिजीटल साक्षरता अभियान राबवून बँकेचे ज्ञान सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून द्यावे.
त्याचप्रमाणे आदर्श दुध उत्पादकांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.
सदरहू कार्यक्रमाला डॉ.दिलीप लोखंडे, डॉ.राजेंद्र चिंचोले, डॉ.राजेंद्र कातोरे, डॉ.राजेंद्र शिरसाठ, विठ्ठल चव्हाण, शरद पवार, प्रमोद चौधरी, मनोहर चौधरी, राजेंद्र सोमवंशी, आत्माराम पाटील, वैभव कासार, गणेश गिरासे,गौतम आखाडे, निलेश राजपूत, संतोष सोमवंशी, मोतीलाल सोमवंशी, अमोल सोमवंशी आदिंचे अनमोल सहकार्य लाभले. सदरहू कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तारांकित अकॅडमीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments