धुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून हा मेळावा ऑनलाइन पद्धतीने होईल. यामधील मुलाखती व्हीडिओ कॉन्फरन्स (Skype, Whatsapp, zoom etc शक्यतो Google Meet) तसेच मोबाईलद्वारे होतील. या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या नियोक्त्यांकडून रिक्तपदे व www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अधिसूचित करण्यात येतील. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी वरील संकेतस्थळाला लॉग-इन करावे.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.Mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉइड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून Mahaswayam हे मोफत अॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी. तसेच लॉग- इन करुन मेळाव्यातील उपलब्ध रिक्तपदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे.
भरती इच्छुक उद्योजकांनी जास्तीत जास्त रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Pandit Dindayal Upadhyay Job Fair 3 ऑप्शनवर Clickकरून Dhule Online Job Fair 3 यामध्ये अधिसुचित करावीत. याबाबत काही अडचण असल्यास या कार्यालयाच्या ०२५६२-२९५३४१ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments