Header Ads Widget

*धुळे जिल्ह्यातील त्या 41 शेतकऱ्यांना मिळणार वीस वर्षानंतर 18 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ*



शिंदखेडा प्रतिनिधी= धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 41 शेतकऱ्यांना 20 वर्षानंतर पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने भूविकास बँके कडील थकित कर्जमाफीचा लाभ दिला आहे त्यामुळे जिल्ह्यातील 41 शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 18 लाख 94 हजार रुपये शासनाच्या सहकार विभागाला परत करावे लागणार आहेत यासाठी शिंदखेडा तालुक्याचे माजी आमदार रामकृष्ण पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप दादा बेडसे यांनी शासनाच्या सहकार खात्याकडे पाठपुरावा केला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्याचे आदेशही नागनाथ एलगेवाड अप्पर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहेत
             धुळे नंदुरबार जिल्ह्यातील 41 शेतकऱ्यांनी राज्य भूविकास बँकेचे शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी 1995 च्या काळात कर्ज घेतले होते सदरील शेतकऱ्यांना सातबार्यावर भूविकास बँकेचा बोजा असल्याने पिक कर्ज देखील मिळत नव्हते सदरील सुमारे 41 शेतकऱ्यांनी संघटित होत ओ टी एस योजनेत दहा टक्के व्याजाची रक्कम देखील शासनाकडे भरली होती परंतु शेतकऱ्यांकडून दहा टक्के व्याजाची रक्कम वसूल केली होती शासन स्तरावर 6 टक्के व्याज आकारणीच्या निर्णय असल्याने उर्वरित 4 टक्के दुराव्याची रक्कम सुमारे 18 लाख 94 हजार 78 रुपये राखून ठेवण्यात आली होती सदरची रक्कम शासनाकडून परत मिळावी यासाठी माजी आमदार रामकृष्ण पाटील तसेच राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी राज्याचे सहकार मंत्री
 नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला त्यामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत आहे राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे यासाठी महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे उप मुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफी मुळे व्याज दर दहा टक्के वरून 6 टक्के आकारणीचा निर्णय असल्यामुळे 4 टक्के परतावा अखेर शासनाकडून मिळाला आहे भूविकास बँकेतील 41 सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर आता ही रक्कम जमा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत आपले बुडीत रक्कम पाठपुराव्यामुळे परत मिळणार असल्याने शेतकर्‍यांच्या वतीने शांताराम पाटील विखरण देवीदास पाटील लामकानी बटू भिवसन पाटील मेहरगाव कैलास पाटील गोकुळ विश्राम पाटील बटू विश्राम पारधी मेहरगाव आदी शेतकऱ्यांनी माजी आमदार रामकृष्ण पाटील व संदीप बेडसे यांचा शिंदखेडा येथील राष्ट्रवादी कार्यालयात सत्कार केला

Post a Comment

0 Comments