चिमठाणे प्रतिनिधी - आज वाय. बी.
चव्हाण सेंटर, मुंबई येथे देशाचे नेते राष्ट्रवादी
काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा, शरदच पवार यांची
धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी
अध्यक्ष संदीप बेडसे यांनी भेट घेतली.
या भेटीदरम्यान शरद पवार यांनी
स्वतः विचारपुस केली असता, शिंदखेडा
तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या
नुकसानीची माहिती त्यांना देण्यात आली.
तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री
जयंतराव पाटील यांनी ११५ कोटीच्या
उपसा सिंचन योजनेची सुधारित प्रशासकीय
मान्यता दिल्याबद्दलचीही माहिती दिली व
शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचा कार्य
अहवाल सादर केला. यावेळी शरद पवार
यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

0 Comments