Header Ads Widget

*दुसरे विश्व अहिरानी संमेलन उद्घाटन सोहळा मुंबईत थाटामाटात संपन्न*





उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद आयोजित दुसरा विश्व अहिराणी संमेलन


 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय जवळ मुंबई येथे आज शनिवार दि: २२ जानेवारी,२०२२ रोजी दिमाखदार स्वरुपात आणि थाटामाटात संपन्न झाला  पहिल्यांदा अहिराणी भाषेचा उत्सव मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरात झाला. मुंबईमध्ये लोकांना अहिराणी भाषा बोलतांना अभिमान वाटत होता.  मुंबईमध्ये आज खूप चांगल्या पद्धतीने सर्व मान्यवरांनी अहिराणीत भाषण करून आहिराणी मायबोलीचा जागर केला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बरच अहिराणी तून बोलले अहिराणी तून शुभेच्छा दिल्या आणि अहिराणी भाषेचा  शेड्युल आठ मध्ये समावेश करणेसाठी आणि भाषेविषयीच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेल असं उपस्थितांना आश्वासित केलं. महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री मा.श्री. गिरीश भाऊ महाजन यांनी सदैव खान्देशसाठी आणि अहिराणी भाषासाठी मी तत्पर आहे. आज जरी माझ्या भागात अहिराणी भाषा न बोलता तावडी भाषा बोलली जात असली तरी अहिराणी ही प्रमुख भाषा आहे आणि तिचा मला सार्थ अभिमान आहे आणि जगातील जवळजवळ तीस पस्तीस देशातील लोक दोन कोटी लोक जी भाषा बोलतात हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे असं आपल्या वक्तव्यातून सगळ्यांना सांगितलं आणि अहिराणी भाषासाठी आणि खान्देशसाठी  सर्वांना सर्वोतपरी सहकार्य करायला मी तयार आहे असं पण आश्वासित केलं संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय मंगेश चव्हाण यांच
यांच्यामुळेच हा सोहळा एक पंचतारांकित जागेत मुंबईसारख्या एरियात संपन्न झाला आणि आपण अहिराणी भाषेला आज खरोखर न्याय देऊ शकतो असं वक्तव्य उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केलं तसेच देवेंद्र फडणवीस आणि गिरीश भाऊ आणि उपस्थित मान्यवरांना अहिराणी अकॅडमी खान्देश भवन आणि अहिराणी भाषेला शेड्युल आठ मध्ये समाविष्ट करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली स्वागताध्यक्ष आदरणीय आमदार मंगेश चव्हाण  यांनी आपल्या मायबोलीचे ऋणनिर्देश आपण करायचेच आहेत .आपण यायचे क्षण कधीच फेडू शकत नाही.यासाठी काम करणं ही आपली जबाबदारी आहे ती आपण पार पाडायला पाहिजे आणि सगळ्यांनी खान्देशी माणसांनी एकत्र होऊन संघटीत होऊन पुढे जाण्यासाठी कटिबद्ध व्हायला पाहिजे अहिराणी साठी मी सर्वोतपरी सहकार्य करेन आपण अहिराणी ला राज्याच्या शेड्युल आठ मध्ये समाविष्ट करण्यासाठी मा.देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली याचा आम्हाला अभिमान आहे. कोकण पदवीधर संघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे साहेब यांनीही आपला अहिराणी माणसांविषयी सुंदर बोधकथा सांगितली.लक्ष्मी व शनीमध्ये सुंदर कोण खान्देशी माणूस सांगतो की दोन्ही सुंदर आहेत लक्ष्मी येतांना आणि शनी जातांना. खानदेशी लोकं माझी मतदारच आहेत त्यांना मी सदैव मदत करण्यासाठी तयार आहे असं सांगितलं संमेलनाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब पाटकर यांनी अहिराणी ची महती आणि महिमा अहिराणीच्या ओव्यांतून मांडली आणि खान्देशातली जी परिस्थिती आहे त्याच्यावर मान्यवर मंडळींनी लक्ष घालावं आणि मराठी  साहित्यिकांना व  मराठी भाषेलाही अनुदान मिळते मग अहिराणी भाषेच्या उपक्रमांनाहोते व साहित्यिकांना पण अनुदान मिळावे अशी उपस्थितांना विनंती केली संमैलनाध्यक्ष डॉक्टर एस के पाटील यांनी संपूर्ण संमेलनाची महती सांगितले आणि हे सगळं बघून मी भारावून गेलो आहे ओव्या सादर करून अहिराणीची महती सांगितले आणि मान्यवरांना अहिराणी साठी सहकार्य करण्याची विनंती केली त्यांनी स्वतः तुकारामाच्या गाथा आहिराणीत भाषांतर केलेली आहे. तसं विविध साहित्य इतरांनी अहिराणीत लिहावं आणि अहिराणी मध्ये इतर भाषांचाही उपयोग व्हावा असे आवाहन केला...!
सदर कार्यक्रम प्रसंगी खजिनदार ए.जी.पाटीलसर,परीषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब पिंगळे, परीषदेचे विभागीय अध्यक्ष,मगन सुर्यवंशी,एन.एच .महाजन, विनायक पवार, उद्योजक प्रकाश बावीस्कर, भैय्यासाहेब पाटील,रवि पाटील, किशोर पाटील  महिला आघाडी अध्यक्षा सौ. मानसी पाटील, विद्या अहिरे,भारती वानखेडेकर,सौ.सुनिता बोरसे, सुनंदा वाघ, सतिश पाटील,संजय पाटील, जितेंद्र वाघ, उपाध्यक्ष एल.आर.पाटील, प्रकाश पाटील,विजय पाटील साहित्यिक,लेखक,कवी व मायबोली आहिराणी वर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक उपस्थित होते.बहारदार सूत्रसंचालन विनोद शेलकर, वैदेही पाटील, वर्षा पाटील यांनी केलं.पाहूण्यांचा परीचय व स्वागत मंडळाचे उपाध्यक्ष एन.एम.भामरे यांनी केलं.आभारप्रदर्शन मंडळाचे उपाध्यक्ष मा.श्री. प्रदिप अहिरे सरांनी केलं आणि अत्यंत सुंदर आणि संस्मरणीय कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments