Header Ads Widget

नंदुरबार: सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच स्वीकारताना अटक...


नंदूरबार: नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठवडाभरातील दुसरी मोठी कारवाई केली आहे. अक्कलकुवा येथील बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांना 43 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई सुरू असतानाच आज धुळे सटाणा तालुक्यातील नामपूर पोलीस दुरक्षेत्रतील सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ लाला महाजन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना अटक केली आहे.

तक्रारदार यांच्या आई वडील व दोन बहिणी अशा पाच जणांविरुद्ध भा.द.वि. कलम 498 (अ), 323,504,506,34 अन्वये गुन्हा दाखल असून त्यात तक्रारदार यांची आई व दोन्ही बहिणी यांची नावे गुन्ह्यातून कमी करण्यासाठी 40,600 रुपयांच्या लाचेची मागणी करून त्याचा पहिला हप्ता 10,000 रु. स्वीकारताना आरोपी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ महाजन यांना नामपूर दूरक्षेत्र, ता.सटाणा येथून ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आठवड्याभरातील दुसरी मोठी कारवाई असून शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने नागरिकांकडून पैशांची मागणी केली असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सदर कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ, उत्तम महाजन, देवराम गावित, विजय ठाकरे, मनोज अहिरे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments