धुळे तालुका पोलिसांनी १० मोटर सायकली चोरट्यांकडून हस्तगत केल्या आहे. या चोरीप्रकरणी चोरट्यास नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले.
तसेच त्याचा साथीदार अंकुश एकनाथ शिरसाठ रा.खडकी ता.चाळीसगांव यास देखील ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्याचे तपासात आरोपींकडे विचारपुस केली असता त्यांनी एकूण ९ मोटार सायकलींची चोरीची कबुली दिली होती. या तपासादरम्यान तालुका पोलिसांनी ९ मोटारसायकली हस्तगत केली आहे. तसेच धुळे तालुका पोलीस अन्य एका गुन्ह्यातील आरोपी विजय साईनाथ चव्हाण याचे कडून १ चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आलेली आहे. अशा एकूण दहा मोटरसायकली तालुका पोलिसांनी हस्तगत केली आहे. बोरकुंड शिवारातून अज्ञात व्यक्तीने फिर्यदीची मोटार सायकल चोरी केल्या वरून अज्ञात आरोपी विरुध्द धुळे तालुका पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा हा योगेश शिवाजी दाभाडे रा.बळसाणे ता.साक्री याने केला असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. त्यावरून धुळे तालुका पोलीस स्टेशनचे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी संशयीताचा शोध घेतला असता, सदरचा संशयीत आरोपी हा वारंवार राहण्याची ठिकाणे व मोबाईल नंबर बदलत असल्यामुळे कौशल्याने त्याची माहिती काढून या चोरांना गजाआड केले आहे.
0 Comments