Header Ads Widget

न्याहळोद ते धुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून रस्ता दुरुस्तीची मागणी



न्याहळोद (जि. धुळे) : न्याहळोद ते धुळे रस्त्याची दयनीय  अवस्था झाली असून रस्ता दुरुस्तीची  मागणी वाहनधारक व ग्रामस्थांमार्फत होत आहे.

काही महिन्यापूर्वी न्याहळोद येथून धमाने रस्त्यापर्यंत एक किलोमीटर अंतराचा रस्ता काही अंशी बऱ्यापैकी दुरुस्ती करण्यात आली. मात्र तेथून पुढे बिलाडी ते धुळे रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून, धमाने ते बिलाडी व धुळे या अंतरावर मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्डे चुकविण्याच्या बेतात छोटे-मोठे अपघात होत असल्याचे चित्र आहे. बिलाडी पासून दूधडेअरी, किसान मका फॅक्टरी ते धुळे अतिशय खराब अवस्थेत असून, त्या परिसरात काही महिन्यांपूर्वी गटाराचे काम झाले. गटाराच्या कामात अर्ध्या रस्त्यावरचे डांबरीकरण उखडून पाइप टाकण्यात आले आहेत. त्यामुळे तो रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.

वाहन चालवताना वाहन चालकाला जीव मुठीत घेऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने डांबरीकरण उखडलेल्या भागात पाणी साचल्याने वाहन घसरुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपघातांची अशीच परिस्थिती राहिली तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. रस्ता खराब असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून, संबंधित विभागाने तत्काळ रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमार्फत होत आहे.

Post a Comment

0 Comments