Header Ads Widget

दोंडाईचा शहरातील सिंधी कॉलनीत धारदार व घातक हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या टोळीतील तिघांना पोलिसांनी शिताफीने जेरबंद



धुळे : दोंडाईचा शहरातील सिंधी कॉलनीत धारदार व घातक हत्यारांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या टोळीतील तिघांना पोलिसांनी शिताफीने जेरबंद  केले.

अन्य तिघे मात्र अंधारात काटेरी झुडपातून पसार झाले. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. 

दोंडाईचा पोलिस शनिवारी मध्यरात्री पेट्रोलिंग करीत होते. त्यादरम्यान दीड वाजेच्या सुमारास दोंडाईचा- शहादा महामार्गावरील बंद टोल नाक्याच्या आडोश्याला सिंधी कॉलनीत काही जण संशयितरीत्या फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी शिताफीने तीन जणांना पकडले. इतर तिघे पसार झाले. आज्या ऊर्फ अजीज सलीम खाटीक (वय- ३५), शौकत सलीम तेली (वय- ३०) व करन बालू भिल (वय- ३० रा. दोंडाईचा) अशी तिघांनी त्यांची नावे सांगितली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार, स्क्रू ड्राईव्हर, जाड सळई, एक लोखंडी दांडा, लोखंडी पात्याची कुऱ्हाड असे साहित्य जप्त करण्यात आले.

पळून गेलेल्या तिघांमध्ये विजय नेतले, नीलेश संसारे व मनोज जग्या भिल (रा. दोंडाईचा) याचा समावेश आहे. ही टोळी सिंधी कॉलनीत दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. त्यापूर्वीच पोलिसांनी त्याचा डाव उधळून लावला. याबाबत अनिल धनगर यांच्या फिर्यादीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक शरद लेंडे तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments