Header Ads Widget

धुळे जिल्ह्यातील 16 स्वस्त धान्य दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध



धुळे, 5 जुलै (हिं.स.) : धुळे जिल्ह्यातील सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आतापर्यंत रद्द असलेली, राजीनामा दिलेली, नवीन प्रस्तावित व इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या 16 नवीन रास्त भाव दुकान मंजुरीसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

धुळे तालुक्यातील तीन, साक्री पाच, शिरपूर एक आणि शिंदखेडा सात अशा 16 नवीन रास्त भाव दुकानांचा जाहीरनामा गाव चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, तालुक्याच्या सूचना फलकावर तसेच गाव दवंडी देवून प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबाबतचा जाहीरनामा जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ www.dhule.gov.in यावर देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे.

तालुकानिहाय रास्त भाव दुकानांची माहिती अशी (अनुक्रमे गावाचे नाव व दुकान क्रमांक या क्रमाने) : धुळे शहर व तालुका : लोहगड- 150, लोणकुटे- 174, पिंप्री-170. साक्री तालुका : नागझिरी- 91, कालटेक- 89, लखाळे- 227, विहीरपाडा- 192, मळखेडे- 170. शिरपूर तालुका : थाळनेर- 105. शिंदखेडा तालुका : भिलाणे दिगर- 170, सुकवद- 12, टेंभलाय- 183, बाभुळदे- 184, डांगुर्णे- 18, वाघाडी खु.- 47, पिंप्री- 157.रास्त भाव दुकान ज्या गटास चालविण्यासाठी घ्यावयाचे असेल त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तहसील कार्यालयाकडून दहा रुपये अर्ज शुल्क भरून प्राप्त करून घ्यावेत. अर्ज परिपूर्ण भरुन आवश्यक त्या कागदपत्रांसह पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे यांच्या कार्यालयात समक्ष अथवा नोंदणीकृत डाकेने 1 ऑगस्ट, 2022 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात सादर करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

रास्त भाव दुकानांच्या जाहिरनाम्याचा कालबद्ध कार्यक्रम असा : नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्याकरीता जाहिरनामा प्रसिद्ध करणे- 1 जुलै, 2022. संस्थांना अर्ज करण्याकरीता मुदत- 1 ऑगस्ट, 2022 पर्यंत. नवीन दुकानाकरीता प्राप्त झालेल्या अर्जांची प्राथमिक तपासणी, छाननी, जागेची तपासणी व इतर अनुषंगिक कार्यवाही पूर्ण करणे- 2 ते 31 ऑगस्ट, 2022 नवीन दुकान मंजूर करणे- 1 ते 30 सप्टेंबर 2022 याप्रमाणे आहे.

Post a Comment

0 Comments