Header Ads Widget

जि.प.प्राथमिक शाळा पाष्टे येथे राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा परिषद दिल्ली या पथकाने भेट



*जि.प.प्राथमिक शाळा पाष्टे येथे आज दिनांक 5/7/2018 रोजी राष्ट्रीय बाल हक्क सुरक्षा परिषद दिल्ली या पथकाने भेट दिली.या पथकाचे प्रमुख सामिया इब्राहिम मॅडम व त्यांचे सहकारी श्री वसीम आलम व रशिदा मॅडम ,श्री चिन्मय आटाळे, भाग्यश्री पाटील, श्री.किशोर पाटील टीम समन्वयक तसेच केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अरविंद पाटील हे उपस्थित होते त्यांनी शालेय परिसराची पाहणी करून डिजिटल क्लास रूम व इतर वर्ग खोल्यायांचे निरीक्षण केले.डिजिटल वर्गाबद्दल विद्यार्थ्यांशी हितगुज केली विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचे कौतुक केले तसेच  संगणक प्रणाली हाताळणी बाबत विचारपूस केली व विद्यार्थ्यांकडून संगणक हाताळणीचे प्रात्यक्षिक करून घेतले.शाळेचे उपक्रम, संगणक कक्ष, शाळेची शिस्त, शालेय पोषण आहार पाहून समाधान व्यक्त केले.आलेल्या पथकाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाष्टे कडून मनपूर्वक आभार..*
  🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Post a Comment

0 Comments