Header Ads Widget

*संगमनेर शहराच्या लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई सुधीर तांबे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून करण्यात आला साजरा..!* *धुळे शहरातील महाजन हायस्कूल, देवपूर येथे वृक्षारोपण करून शिक्षक वर्गास रोपे देण्यात आली भेट..!*




(धुळे दि. ११/०७/२०२२) झाडे नेहमीच मानवाचे मित्र आहे. ते निसर्गाशी परोपकारी भावना व्यक्त करतात. मानवाला त्यांच्याकडून बरेच काही मिळते. ते मानवी जीवनाचा एक आवश्यक भाग आहेत. म्हणूनच प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत ‘वृक्षारोपण’ करण्याला खूप महत्व आहे. जास्त झाडे असणे हे त्याच्या आनंद, सौभाग्य आणि समृद्धीचे लक्षण आहे. वृक्ष हे पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहेत. आपल्या भोवताली असलेली झाडे आपल्याला फक्त सावली देत नाहीत तर वृक्षांपासून आपल्याला अनेक फायदे आहेत. वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे घेतात आणि जीवनावश्यक असा अक्सिजन आपल्याला देतात. ऑक्सिजन नसेन तर आपले पृथ्वीवर जीवनावश्यक आहे.
याच अनुषंगाने संगमनेर शहराचा विकासाचा वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्षा आदरणीय सौ. दुर्गाताई सुधीर तांबे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त धुळे शहरातील महाजन हायस्कूल, देवपूर येथे वृक्षारोपण करून तेथील शिक्षक वर्गास रोप भेट देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र बाविस्कर, उपमुख्याध्यापक व्ही. बी. पाटील, पर्यवेक्षक बी. व्हि. पदमार, पर्यवेक्षक ए. ए. बागुल, राजेंद्र वाकळे, वर्षा ठाकूर, वर्षा भामरे, व्ही. टी. महाजन, संदीप सोनवणे, आर. एस. माळी, मनीषा ठाकूर, महेंद्र जगताप तसेच अन्य शिक्षक बंधू-भगिनी यांच्या समवेत आमदार सुधीर तांबे यांच्या वतीने निलेश काटे, शरद गुंजाळ, ऋषिकेश जोंधळे, गणेश घोगरे, विलास वामन, विजय बोराडे आदि मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments