Header Ads Widget

कलमाडी अगस्तमुनी माध्य.विद्यालयात नुकताच भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (शाखा नरडाणा) वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा



शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात नुकताच भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (शाखा नरडाणा) वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचेअध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम व प्रमुख पाहुणे-शाखा अधिकारी आनंद गजभे,अनिल ढोले,परिश्रमठोंबरे,जितेंद्र भट या सर्वांच्यासमवेत विद्येची देवता माता सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी माननीय.श्री परिश्रम ठोंबर यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या आमच्या बँकेचा वाढदिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांशी बँक विषयी व बँक खाते उघडण्याबाबत लागणाऱ्या कागदपत्र संदर्भात व इतर योजनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना पटवून दिली.
   तसेच स्टेट बँक नरडाणा शाखा प्रमुख आदरणीय, आनंद गजभेसाहेब यांनी म्हटले की,विद्यार्थी मित्रांनो जसे तुमचे वाढदिवस घरी वा शाळेत साजरे केले जातात त्याप्रमाणे आम्हीही ठरवले की आपण कलमाडी विद्यालयात आपल्या 'भारतीय स्टेट बॅंक'चा वाढदिवस विद्यार्थ्यांना चाॅकलेट व पेढे वाटून त्यांची हितगुज साधून विद्यार्थांच्या मनात बँक व बँकेच्या योजना इत्यादी विषयी माहिती देत... विद्यार्थी मित्रांनो 'शिक्षण हे आजीवन पर्यंत घ्यावयाचे असते' शिकाल तरच तुम्हाला पुढे जाता येईल परंतु अशा वेळेस परिस्थिती नाजूकअसेल बँक मात्र शैक्षणिक कर्ज देवून पुढील शिक्षण पुर्ण करता येईल व पुढे भविष्यात जर तुम्ही फ्रान्स,इंग्लंड वगैर देशात जरी गेलात तरीही तुमचा बँक शी संबंध येतो व शिक्षणाच्या माध्यमातून तुमची प्रगती साधता येईल म्हणून चांगला अभ्यास करावा व बँक च्या विविध योजना विषयीही  महत्त्व पटवून दिले.
   शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय,मुख्याध्यापकआबासो.श्री.एस.ए.कदम यांनी प्रथमतः आलेल्या अतिथींचे स्वागत केले तद्नंतर त्यांनी बँक खाते उघडणे,शिष्यवृत्ती योजना,महाराष्ट्र कृषी दिन व राष्ट्रीय डाॅक्टर दिन इ.महत्त्व पटवून देत त्यांनी बँक विषयी मनोभाव व्यक्त करतांना स्वतः मामांच्या मुलाचा स्वानुभव व्यक्त करत म्हणाले की,मामेभाऊंची परिस्थिती हालाकिची होती अशा परिस्थितीत मामेभाऊंनी बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेवून पुढील शिक्षण पूर्ण करून केले व ते आज नोकरीस आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो "तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार!" म्हणूनच शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही! इ.विषयी महत्त्व पटवून दिले व भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा विद्यालयाकडून वाढदिवसाच्या   हार्दिक-हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. व विद्यार्थ्यांना चाॅकलेट व पेढे वाटप करण्यात आले.
    या कार्यक्रमास वरील मान्यवर,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
        यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर आभार - श्री.सी.जी.वारूडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments