Header Ads Widget

दोंडाईचा, दहा वर्षाच्या चिमुरडीवर पित्याने लोखंडी हातोडीने वार,। पित्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा



धुळे : मला झोप येत आहे, मी सकाळी लवकर उठून अभ्यास करुन घेईल असे सांगणाऱ्या दहा वर्षाच्या चिमुरडीवर पित्याने लोखंडी हातोडीने वार केले. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली.

संगीता विनोद बागले (वय २८, रा. सिद्धार्थ नगर, दोंडाईचा, ता. शिंदखेडा) यांच्या फिर्यादीनुसार तिच्या दहा वर्षाच्या मुलीने ३० जूनला रात्री नऊला वडिलांना मी सकाळी लवकर उठून अभ्यास करुन घेईल, मला झोप येत आहे, मी आता झोपते, असे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या विनोद सरदार बागले याने लोखंडी हातोडीने तिच्या मांडीवर, मानेवर, पाठीवर आणि डोक्यावर हातोडीने वार केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. त्यामुळे संशयित पित्याविरुद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Post a Comment

0 Comments