धुळे : अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पंधरवाडा आयोजित करण्यात येत आहे. यानिमित्त शहरात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून आज धुळे शहरातून सायकल रॅली काढन्यात आली.
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त धुळे जिल्हा पोलिसांच्यावतीने पोलीस अधीक्षक कार्यातून शहरातील विविध ठिकाणी सायकल रॅली काढली. यात बॅनर लावून अंमली पदार्थ दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली. ही सायकल रॅली अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील विविध ठिकाणी मुख्य चौका चौकात जाऊन अमली पदार्थ दुष्परिणामावर सायकलवर बॅनर झळकवत जनजागृती करण्यात आली. यावेळी धुळे शहरातून बारा किलोमीटरचा प्रवास करत या सायकल रॅलीचे पोलीस हेडकॉटर येथे सांगता करण्यात आली. या सायकल रॅलीत धुळे शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच धुळे शहरातील इतर सायकलिस्टचा देखील समावेश होता.
0 Comments