Header Ads Widget

*अप्पर तहसील कार्यालयाला नविन इमारत मिळणार केव्हा !


दोंडाईचा अप्पर तहसील कार्यालय सुरु होऊन सहा वर्षे झाली.दोंडाईच्यात अप्पर तहसील कार्यालय मिळाले तेव्हा सर्वांना आनंद झाला की सर्व सामान्य लोकांची कामे आता दोंडाईच्यात होतील. अप्पर तहसील कार्यालयाचे उदघाटन तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते झाले होते.तेव्हा नगरपरिषदचे जुने कार्यालय तात्पुरते महसूल विभागाला दिले आहे.त्या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय सुरु होऊन सहा वर्षे झाले परंतु आजपर्यंत  अप्पर तहसील कार्यालयाला नविन इमारत मिळत नाही.जुनी नगरपरिषद कार्यालय बांधकाम जवळपास 70 वर्षे झाली असावी त्या बांधकामाची एक्सपायरी डेट संपली असल्यामुळे जुनी इमारत केव्हाही पडू शकते या कारणामुळे नगरपरिषद नविन इमारत मंजूर करुन घेतली त्यानुसार नविन इमारत तयार होत असतांना काम प्रगती पथावर होते तरी नविन इमारत तयार होईपर्यंत नगरपरिषद कार्यालय पडक्या इमारत मध्ये ठेवले नाही जुनी इमारत पडकी झाली आहे या कारणास्तव तात्पुरते नगरपरिषद कार्यालय नदीच्या काठी घरकुल सभागृहात सुरु केले होते. कारण त्या ठिकाणी नगरपरिषद कर्मचारी आणि नगरसेवक यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. परंतु त्यांच इमारत मध्ये सहा वर्षा पासून पडक्या अवस्थेत आहे तरी अप्पर तहसील कार्यालय सुरु आहे. त्या कार्यालयाला 15 आॅगस्ट निमित्त बाहेरुन रंगरंगोटी करुन नवी इमारत आहे असा देखावा करावा लागतो वास्तविक एक्सपायरी डेट संपलेली इमारत आहे त्या इमारत मध्ये अप्पर तहसीलदार सह कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. शासनाने नगरपरिषद कर्मचारी व नगरसेवक यांच्या जीवाची काळजी घेतली तशी काळजी अप्पर तहसीलदार सह कर्मचारींची घ्यावी त्यांना ही नविन इमारत द्यावी......

Post a Comment

0 Comments