Header Ads Widget

-*☸️भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा तर्फे धुळे जिल्हास्तरीय शिंदखेडा येथे रॅली प्रदर्शन (३ रे चरणबद्ध आंदोलन) संपन्न☸️*




-------------------------
भारत मुक्ती मोर्चा ,बहुजन क्रांती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी , बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तसेच इतर सहयोगी संघटनांमार्फत तिसऱ्या चरणबद्ध आंदोलनाचा टप्पा आज धुळे जिल्ह्यातील 


शिंदखेडा येथे संपन्न झाला. या मोर्चाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. अजय भाऊ मंगळे(करवंद,शिरपूर) यांनी केले.शिंदखेडा येथील स्टेशन रस्त्यावरील भगवा चौक चौफुली, सहकार भवन येथील छत्रपती शिवरायांचा अर्धा कृती पुतळा , तसेच कचेरी चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असा रॅलीचा मार्ग होता.
       रॅलीच्या दरम्यान सहकार भवन येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला भिल्ल विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष मा. दिपक अहिरे यांनी पुष्पहार अर्पण केला. रॅली पुन्हा मार्गस्थ झाली. कचेरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सर्वप्रथम कल्पनाताई इंदवे, (धुळे जिल्हाध्यक्ष, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क)यांनी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रॅली सुरू असताना विविध प्रकारच्या क्रांतिकारी घोषणा देण्यात आल्या.
       रॅलीचे रूपांतर छोटे खानी सभेत झाले.भिल्ल विकास मंचचे मा.दिपकभाऊ अहिरे , प्रा.निरंजन वेंदे(बौद्ध महासभा) मा. बापूसो.दिलीप भाईदास पाटील (राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा,धुळे) यांनी सभेला संबोधित केले.
        अध्यक्ष समारोप मा. नानासाहेब पिंपळे (बहुजन मुक्ती पार्टी धुळे जिल्हाध्यक्ष) यांनी केला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मा. दिनेश मोरे (भारत मुक्ती मोर्चा, शिंदखेडा तालुका प्रभारी) यांनी केले.
        याप्रसंगी , मा शशिकांत अण्णा बैसाणे (बहुजन क्रांती मोर्चा,शिंदखेडा संयोजक),मा. कल्पनाताई इंदवे (बिन, धुळे जिल्हाध्यक्ष)मा. हमीद भाई पठाण (राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,बेटावद), मा गणेशभाऊ नगराळे, दोंडाईचा(भारतीय बेरोजगार मोर्चा, धुळे जिल्हाध्यक्ष), आकाश भाऊ वाघ (भारत मुक्ती मोर्चा,धावडे)मा. गुलाब भाऊ महाले (सामाजिक कार्यकर्ते,दभाशी), मा रामसिंग भिल,धावडे(राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद,)मा.इरफान खाटीक,मा.नितीनभाऊ बागले(सुरत),भूपेश मंगळे (बाल विद्यार्थी मोर्चा सदस्य ,करवंद), मा. बापू बैसाणे(कदाणे तालुका शिंदखेडा),अमोल नगराळे (चिरणे ,तालुका शिंदखेडा) आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments