नंदुरबार-- याप्रसंगी मोठ्या संख्येने जमलेल्या नंदुरबार येथील नागरिकांना संबोधित करताना, हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून
नागरिकांच्या अपेक्षापूर्तीला प्राधान्य देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही दिली. शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून संकटग्रस्तांच्या नुकसान भरपाईची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत वाढविली असून नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहन रक्कम वाटप सुरू केले असल्याचेही स्पष्ट केले.
शहरांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे नमूद करून, नगरविकास विभागाकडून नंदुरबार नगरपरिषदेची थकीत रक्कम तात्काळ मंजूर झाल्याचे यावेळी जाहीर केले.
नंदूरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वेतोपरी मदत करण्यात येईल असेही यावेळी बोलताना सांगितले.
याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार डॉ.हिना गावित, खासदार राजेंद्र गावित, आमदार किशोर दराडे, आमदार चिमणराव पाटील, आमदार काशिराम पावरा, आमदार किशोर पाटील, आमदार मंजुळाताई गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करनवाल, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे, नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी आदी मान्यवर उपस्थित.
0 Comments