Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच शिक्षकेत्तर दिन व बिरसा मुंडा यांची जयंती साजरी




म्हळसर- छोटू वारूडे (प्रतिनिधी)
 शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच शिक्षकेत्तर दिन साजरा करण्यात आला व याच दिवशीच बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी संघटित साजरी करण्यात आली.
    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचेआदरणीय,मुख्याध्यापकआबासो.श्री.एस.ए.कदम यांच्या हस्ते प्रथमतः क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून श्रीफल, पुष्प, पुष्पहार अर्पण करण्यात आले.
         तद्नंतर विद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद- लिपिक भाऊसाहेब श्री.जे.एस.कदम, शिपाई -  एम.वाय पाटील भाऊसाहेब, श्री पी.एस.सिसोदेभाऊसाहेब,आप्पासाहेब श्री.डी.डी.कदम,व श्री पी.डी.खोडें नाना  या सर्वांना विद्यालयाचे मुख्याध्यापकांनी शाल,श्रीफळ, व गुलाब पुष्प देवून सन्मानित केले त्यानंतर आदरणीय मुख्याध्यापक यांनी प्रथमतः क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जीवनशैली विषयी मनोभाव व्यक्त केलेत नंतर  शिक्षकेत्तर वृंद यांच्या त्यांच्या केलेल्या कामांविषयी मनोभाव व्यक्त केलेत की शाळा, परिसर ,ऑफिसातील स्वच्छता व वर्गसापसफाई इ.स्वच्छ वातावरण सुंदर दिसून येते.जीवनात आपण ही अशा प्रकारे  प्रेरणा घेवून "स्वच्छ शाळा ,सुंदर शाळा!" इ.विषयी महत्त्व पटवून दिलेत.तद्नंतर ऐन वेळी. विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री आबासो जे बी पाटील उपस्थित झाल्याने विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.ऐन.कदम यांच्या हस्ते श्री.आबासाहेब श्री.जे.बी.पाटील यांचा शाल, श्रीफळ गुलाब पुष्प देवून गौरवण्यात आले.व संस्थापकांनी ही  शिक्षकेत्तर वृंद यांचे शब्द सुमनांनी अभिनंदन केलेत.
     यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री एस.बी भदाणे यांनी केले.तर आभार - श्री.पी.आर. पाटील सरांनी मानले कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments