प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा विरोध असुन एक डिसेंबरला होत असलेल्या शेतकऱ्यांचे आक्रोश आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज पदाधिकारीच्या उपस्थितीत देण्यात आले. सदरच्या निवेदनाद्वारे म्हटले आहे की, शिंदखेडा तालुक्यातील विखरण देवाचे येथील आदिवासी व इतर समाजातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी सन-2012 ह्या वर्षी औष्णिक विद्युत प्रकल्प अंतर्गत खरेदी केली होती त्यानंतर सदरची जमीन ही औष्णिक विद्युत प्रकल्पातुन वर्ग करुन सोलर प्रकल्पात वर्ग केलेली आहे. त्यावेळी संबंधित शेतकऱ्याच्या शेतजमीन खरेदी करून संबंधित कंपनीत शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा वारसांना औष्णिक विद्युत प्रकल्पात नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले होते.म्हणुन शेतकरी हा वारसांना आज ना उद्या नोकरी लागेल ह्याच आशेने आतुरतेने वाट पाहत होता. सदर प्रकल्प हा सोलर प्रकल्पात वर्ग करण्यात आल्याचे समजते असता शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे म्हणून ह्या घटनेला दहा वर्षांचा कालावधी लोटला असुन शेतकरी वर्गाची दिशाभूल झाल्याने संतप्त आदिवासी व इतर शेतकऱ्यांनी एक डिसेंबरला आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यात सदरच्या मागण्या ठेवले आहे 1) औष्णिक विद्युत प्रकल्पाला आमचा विरोध नाही पण सोलर प्रकल्पाला आमचा विरोध कायम राहील. 2) औष्णिक विद्युत प्रकल्प तयार होऊन वारसांना नोकरी द्यावी. 3) शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर, पाइपलाइन,झाडे यांचे मुल्यांकन करून मोबदला मिळावा. 4) शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान वाढीचा मोबदला मिळावा. 5) औष्णिक विद्युत प्रकल्प खरेदी विक्रीचा भंग केला म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन व आक्रोश आंदोलनास जाहीर पाठिंबा आहे यासाठी शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांच्या सह बापुजी फुले, सुनील सोनवणे, राजेश मालचे, श्रावण मराठे, आकाश पवार,कालु मोरे, अत्तर खाटीक,भटु मालचे, भाऊ मालचे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ह्यावेळी होत असलेल्या एक डिसेंबरला आदिवासी व इतर शेतकऱ्यांनी आक्रोश आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दिपक अहिरे यांनी केले आहे.


0 Comments