बेटावद प्रतिनिधी.
शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे आणि माळीच शिवारातील शेतकरी सध्या दोन्ही कंपन्यांच्या प्रदूषणामुळे मोठ्या संकटात सापडले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या इशारा दिला आहे
सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील व वाघोदे तसेच माळीच शिवारातील शेतकऱ्यांनी प्रसिध्दी पत्रक काढून त्यात म्हटले आहे की नरडाणा औदयोगिक क्षेत्रातील वाघोदे गावाजवळील कंपन्या तसेच रस्त्याच्या धुडीमुळे मानवी आरोग्य धोक्यात आले असून कंपन्या मधून डस्ट (बारीक कण) हवेने शेतातील पिकांवर थर जमले असुन पिक काढणी साठी मजूर मिळत नाही तसेच शेतजमीन नापीक होत चालली आहे आरोग्यास ही हानिकारक ठरते आहे कंपन्यामुळे शेत पिकांचे नुकसान होत असून पिक भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
वाघोदे जवळ कोळसा पासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प जिंदाल पावर लिमिटेड नावाने गेल्या चार वर्षा पासून सुरु आहे तसेच कोळसाच्या राखे पासून सिमेंट, निर्मिती करणारा प्रकल्प अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड नावाने साधारण पाच वर्षा पासून सुरु आहे त्यामुळे गावांची व परिसरातील वातावरणात खुपच बदल झाला असून भयाव अवस्था निर्माण झालेली आहे गावातील अनेक ग्रामस्थ, शेतकरी तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने प्रदूषण मुळे प्रशासनाला व कंपनी प्रशासन यांना वेळोवेळी गावाचे व परिसराचे होणाऱ्या नुकसानी बाबत तक्रारी दिल्या आहेत परंतु आज पर्यंत कुठल्याही प्रकारे कार्यवाही झाली नाही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या तक्रारीला कुठलेही महत्व दिले जात नाही व शासनाच्या प्रदूषण नियंत्रण कायदे धाब्यावर बसून सिमेंट निर्मिती करणारा प्रकल्प व वीजनिर्मिती करणारा प्रकल्प मुळे परिसरातील शेतकऱ्यांचे कापसाचे पिकांचे व तसेच इतर सर्व पिकांचे प्रकल्प मधून निघणार्या फाइन अँश व फ्लाय अँश मुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे त्यांच्या तक्रारी ला कुठेही थारा दिला जात नाही हि बाव अतिशय निंदनीय आहे यासंदर्भात शेतकयांनी कंपनीच्या अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या परंतू कंपन्या प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नाही त्यामुळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून याआधी सामाजीक कार्यकर्ते विजय पाटील व शेतकऱ्यांनी विविध विभागागाच्या संबधीत प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे
परिसरातील शेतकरी व गावातील नागरिकांचे आरोग्यास हानी पोहचू नये तसेच न्याय मिळाला नाहीतर मोठे जनआंदोलन उभे करू व न्याय मिळवून देण्यास भाग पाडले जाईल अशी भूमिका मांडण्यात आली असून भविष्यात दोन्ही कंपन्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील व शेतकयांनी बंड पुकारले आहे दरम्यान खरीप हंगामातील पीक नुकसान म्हणून जिंदाल कंपनी कडून काही शेतकर्यांना तुटपुंजी भरपाई देण्यात आली असून ती मान्य नाही शेतकऱ्यांचे हंगामातील उत्पन्न बुडाले असून वाघोदे व माळीच शिवारातील सर्व शेतकर्यांना एकरी ७० हजार रुपये नुकसान पिक भरपाई देऊन समान न्याय देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील तसेच शेतकरी संजय कृष्णा पाटील, विजय मधुकर देसले, संगिताबाई पाटील, भरत भालेराव पाटील, माधवराव गरबड पाटील, संजय नवल पाटील, गणेश कैलास पाटील, सिताराम वाघ आदींनी केली आहे मागणी मान्य न झाल्यास सामुहिक आत्महत्या करण्यास प्रसासनाने परवानगी द्यावी असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी करण्यात आली आहे या प्रसिद्धी पत्रका वरती परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे सह्या आहेत.
या गंभीर इशाऱ्यामुळे परिसरात खळबळ माजली असून,
शेतकऱ्यांनी या मागणीसाठी कंबर कसली आहे आता प्रशासन या स्फोटक परिस्थितीवर काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments