Header Ads Widget

वाचनाचं असं वेड, शिव्याही तेव्हा वाटे गोड 😂🙏

  मित्रांनो, बालपणाच्या आठवणी या जीवनातून कधीच delete होत नाहीत मग त्या आठवणी सुखदायी असो वा दुखदायी!         "  "अरे, वाचाल तर तुम्ही वाचाल.. " असे परीक्षा संदर्भात एका गुरुजीने आम्हाला रागात सुनावले होते. हाच गुरुमंत्र घेऊन आम्ही जीवनास सुरुवात केली. आणि खरंच पुस्तके वाचतोय आणि असे ही वाचत आहोत 70 पर्यंत 😂.
    1967 ते 72 हा आमच्या बालपणीच्या सुवर्णकाळ गेला तो गोमती नदी असलेल्या शहादा येथे. 67 साली 7 वी ला वर्नकुलम फायनल ही बोर्ड परीक्षा शिवाय नियमित 7 वीची परीक्षा असत. कोणतीही पास झाली तर 8 वीत प्रवेश मिळे.
     याचं काळात वाचनाचा मुलमंत्र मिळाला. त्या वाचन वेडासाठी वाचनालय मेम्बर होऊन सर्व दिवाळी अंक वाचनाचे वेडच लागले. बाबुराव अर्नाळकर, काशीकर, चे डिटेक्टिव्ह कथा, झुजार, धूमकेतू,काळापहाड, धनंजय सर्व आवडते पात्र..
      अश्या वाचनाचं वेड मुळे त्यावेळी शहादा गावातील जुनी चावडीजवळ म्हणजे आत्ताच्या संत नामदेव चौकात पूनमचंद भावसार यांची पिठाची चक्की आणि वखार होती. त्या चक्कीवर रोज 11वाजेला लोकसत्ता येत असे.
आम्ही खोल गल्लीत रहात होतो आणि शेजारी आमच्याच शाळेचा मित्र ज्ञानी कुलकर्णी राहत होता.तो मी एकाच वर्गात मात्र त्याची तुकडी होती आणि आमची मी, किसन पवार, सुरेश निंबा आमची तुकडी ड, क कारण आम्हाला टाकावू  उपेक्षित समजले जात असे थोडक्यात आम्ही आजच्या भाषेत" back banchar" होतो. असो.
ज्ञानी आणि माझा नेहमी चक्कीवर कोण लवकर जाऊन अगोदर लोकसत्ता वाचतो असा नेहमी प्रयत्न असे. त्यादिवशी असेच झाले आम्ही दोघे पळतच चक्कीवर आलो लोकसत्ता साठी. पण नेमके चक्की मालकच पेपर वाचत होते. झाले आम्ही दोघे त्यांच्या दोन्ही बाजूला बसुब पेपर वाचण्याचा प्रयत्नात पेपर ओढू लागलो...झालं मालक संतापले आणि आमच्या अंगावर लोकसत्ता फेकून म्हणाले, "वाचा रे भडव्यानो " तरी आम्ही भामट्या सारखे लोकसत्ता वाचू लागलो. इतके वाचन वेड की शिव्याही वाटत होत्या गोड 😔
आम्ही खोल गल्लीत रहात होतो आणि शेजारी आमच्याच शाळेचा मित्र ज्ञानी कुलकर्णी राहत होता.तो मी एकाच वर्गात मात्र त्याची तुकडी होती आणि आमची मी, किसन पवार, सुरेश निंबा आमची तुकडी ड, क कारण आम्हाला टाकावू  उपेक्षित समजले जात असे थोडक्यात आम्ही आजच्या भाषेत" back banchar" होतो. असो.
ज्ञानी आणि माझा नेहमी चक्कीवर कोण लवकर जाऊन अगोदर लोकसत्ता वाचतो असा नेहमी प्रयत्न असे. त्यादिवशी असेच झाले आम्ही दोघे पळतच चक्कीवर आलो लोकसत्ता साठी. पण नेमके चक्की मालकच पेपर वाचत होते. झाले आम्ही दोघे त्यांच्या दोन्ही बाजूला बसुब पेपर वाचण्याचा प्रयत्नात पेपर ओढू लागलो...झालं मालक संतापले आणि आमच्या अंगावर लोकसत्ता फेकून म्हणाले, "वाचा रे भडव्यानो, तुम्ही आधी " तरी आम्ही भामट्या सारखे लोकसत्ता वाचू लागलो. इतके वाचन वेड की शिव्याही वाटत होत्या गोड 😔              असे वाचनाचे वेड होते. काळ पुढे पळत राहिला.. आज ना ती चक्की राहिली ना ते रागवणारे मात्र लोकसत्ता वाचू देणारे चक्की मालक! ना ते यशवंत थिएटर.. ना ती खळखळून वाहणारी गोमती!   राहिल्या त्या वाचन प्रेमाच्या आठवणी! वाचत आहोत म्हणून वाचत म्हणजे जगत आहोत. विमा कंपनीत क्लास one अधिकारी पदावरून VRS घेऊन प्रामाणिक पत्रकारितेची संपादक पदाची सामाजिक जबाबदारी पार पाडीत आहोत ते याच वाचन शक्तीच्या बळावर हेच खरे. आणि तुम्हाला ही आमच्या आठवणी वाचायला लावत आहोत मित्रा नो. कारण वाचाल तरच वाचाल हे आम्हाला पटले तुम्हाला पटले का?                     प्रभाकर सूर्यवंशी, संपादक अभिनव खान्देश धुळे

Post a Comment

0 Comments