Header Ads Widget

*प्रा* *.जितेन्द्र पाटील यांनी गणित विषयात पी एच डी पदवी मिळवल्या बद्दल त्यांचा जनता हायस्कूल तर्फे सत्कार* .

  शिंदखेडा येथील जनता विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तसेच एस एस व्ही पी एस महाविद्यालय शिंदखेडा येथील गणित विभागाचे प्रमुख प्रा.श्री जितेंद्र गोरख पाटील यांनी गणित विषयात पी एच डी पदवी मिळवल्या बद्दल त्यांचा जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री बी जे पाटील यांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
   याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री एस के जाधव,श्री डी एच सोनवणे,श्री एस ए पाटील श्री जे डी बोरसे आदी उपस्थित होते.
   गणित हा विषय जर मूळ पाया पासूनच समजून घेतला तर तो पुढे कठीण वाटत नाही परंतु आज च्या विद्यार्थ्यांनी गणित या विषायाची भीती मनात ठेवू नये.हा विषय विद्यार्थीदशेत समजून घ्यावा व जास्तीत जास्त त्याचा सराव करावा त्यातून तो महाविद्यालयीन जीवनात सोपा वाटतो असे मत यावेळी डॉ.प्रा जितेंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.तसेच पर्यवेक्षक श्री बी जे पाटील यांनी गणित विषयाची व्याप्ती व व्यवहारातील गणित या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार श्री ए. टी.पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments