""""""""""'""""""""""""""""""""""""""""""
धुळे ः - धुळे जिल्ह्याच्या संर्वागिण विकासाला सहाय्यभूत ठरणार्या मनमाड - धुळे- मार्गा च्या कार्यप्रणालीची अध्यावत
माहीती , शासकीय स्तरावरुन , अधिक्रुतरित्या नागरीकांना अवगत करा , अशी विनंती
करणारे निवेदन , नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतिने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आले.
नागरी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष हिरालाल ओसवाल, , तथा सर्वश्री डॉ. जगदिश गिंदोडीया, योगेंद्र जुनागडे, जयेश बाफना, प्रा. एस् टी चौधरी आदी पदाधिकार्या समवेत , नागरी संरक्षण समितिचे सरचिटणिस महेशबाबा घुगे यांनी सदर निवेदन जिल्ह्याधिकार्यांना दिले.
मनमाड - धुळे- इंदोर रेल्वे मार्ग व्हावा अशी मागणी गेल्या शे सव्वाशे वर्षापासून केली जात आहे। त्यासाठी या प्रदीर्घ काळात अनेक राजकीय पक्षांनी , त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी , विविध सामाजिक संघटनांनी वेळो वेळी
विविध प्रकारची आंदोलने केली आहेत.
प्रदीर्घ कालावधीतील, या जन आंदोलनाची दखल घेत
केंद्र शासनाने , या रेल्वे मार्गाला
मंजुरी दिल्याची अधिक्रुत घोषणा केली.रेल्वे मंत्र्यांनी आणि खुद्द, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या रेल्वे मार्गाच्या कामाचे भूमीपूजन केले।
त्या वेळी या रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वाला पैसा कमी पडू दिला जाणार नाही अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी केली .
मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वाची जबाबदारी जवाहर नेहरु पोर्ट ट्रस्ट वर सोपविण्यात
आली असल्याचे व त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद देखील करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी धुळे भेटीत एका कार्यक्रमात केली होती.
एवढे सर्व घडून , मनमाड - धुळे रेल्वे मार्गाचे काम सुरु का होत नाही हे, जाणून घेण्यासाठी,
नागरी हक्क संरक्षण समितीचे
तरण ऊद्योजक पदाधिकारी जयेश दिनेश बाफना यांनी माहितीच्या आधिकारात, माहिती संकलीत केली असता, रैल्वे मंत्रालय, आणि जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट च्या वरीष्ठतम अधिकार्यांनी , मनमाड - धुळे - इंदोर रेल्वे मार्गाचा प्रस्तावच
अद्याप कार्यान्वीत झाला नसल्याचे लेखी स्वरुपात , जयेश बाफना यांना अवगत केले. त्यामुळे धुळेकर नागरीक संभ्रमीत
झाले आहेत.
मनमाड - धुळे- इंदोर
रेल्वे मार्गाच्या कार्यवाही संदर्भात जिल्हाधिकारी या नात्याने , , मनमाड - धुळे - इंदोर रेल्वे मार्गाच्या कामाची अद्यावत माहिती शासकीय स्तरावर संकलीत करुन ती धुळेकर नागरीकांना अवगत करावी , अशी विनंती करणारे निवेदन , नागरी हक्क समितीच्या वतीने , सरचिटणिस महेशबाबा घुगे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले.
मनमाड - धुळे- इंदोर रेल्वे
मार्गा संदर्भात अद्यावत माहिती
"शासकिय स्तरावरुन " नागरीकांना अवगत होई पंर्यत
नागरी हक्क संरक्षण समितीच्या वतीने य संदर्भात जन जाग्रुतीचे व प्रबोधनाचे
काम केले जाणार असल्याचे महेशबाबा घुगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
0 Comments