शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी -
20 पटसंखेच्या आतील शाळा बंद करण्याचे धोरण मागे शासनाने त्वरित मागे घ्यावे. ह्या विषयाच्या अनुषंगाने व *चार टप्प्यातील* राज्यस्तरीय आंदोलनाच्या अंतर्गत निवासी नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले, शिंदखेडा यांच्या द्वारा मा. मुख्यमंत्री व मा.शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना आज निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी संजय बाबुलाल ढिवरे सर, (शिंदखेडा प्रोटान तालुकाध्यक्ष ). सुनिल थोरात सर (राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, धुळे जिल्हा उपाध्यक्ष), प्रा. मधुकर बाबुराव मंगळे (सदस्य,शिंदखेडा प्रोटान)आदी उपस्थित होते.
*आंदोलनाचे टप्पे -*
1) *31 ऑक्टोबर -* पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देणे.
2) *12 नोव्हेंबर 2022 -* सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन.
3) *3 डिसेंबर 2022 -* सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषण.
4) *16 डिसेंबर 2022 -* सर्व तहसील व जिल्हाधिकारी कार्यालया वर रॅली प्रदर्शन.
उर्वरित पुढील तीन टप्प्यातील आंदोलनात *शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी* सहभागी होण्याचे आवाहन
PROTAN युनिट,
शिंदखेडा जिल्हा धुळे.
राष्ट्रीय बहुजन पालक संघ,
युनिट शिरपूर, जिल्हा धुळे. वतीने करण्यात आले आहे.
0 Comments