Header Ads Widget

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात आगळा-वेगळा परिसंवाद डिजिटल मिडिया प्रिंट मिडियाच्या मुळावर आलाय का?



पुणे : बदल हे अटळ असतात.. माध्यम क्षेत्रात देखील दररोज नवनवं तंत्रज्ञान येत असल्याने कालचं तंत्रज्ञान आज कालबाह्य होताना दिसतंय.. हे बदल स्वीकारणं अपरिहार्य असतं.. मात्र हे स्वीकारणं तेवढं सहज असतं? आज डिजिटल मिडियानं माध्यमाचं विश्व व्यापून टाकलंय .. मात्र माध्यम क्षेत्रातील हे बदल प्रिंट मिडियाच्या मुळावर येतात की काय? अशी भिती अनेकांना वाटते .. इलेक्ट्रॉनिक मिडिया आला तेव्हाही ही शंका उपस्थित केली गेली मात्र प्रिंट मिडिया आजही खंबीरपणे उभा आहे.. या पार्श्वभूमीवर डिजिटलच्या या झंझावातात आमचा परंपरागत मिडिया टीकाव धरणार की धारातीर्थी पडणार हा आजचा कळीचा मुद्दा आहे.. त्यामुळे या विषयावर सांगोपांग चर्चा होणं, या विषयाचे विविध पैलू समोर येणं आवश्यक आहे.. त्यामुळेच मराठी पत्रकार परिषदेच्या पिंपरी चिंचवड अधिवेशनात "डिजिटल मिडिया प्रिंट मिडियाच्या मुळावर आलाय का?" या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे..या परिसंवादात सहभागी होत आहेत मराठीतील नामवंत पत्रकार.. त्यामध्ये  ‘सकाळ’चे मुख्य संपादक सम्राट फडणीस, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक पराग करंदीकर, ‘मॅक्स महाराष्ट्र’चे संपादक रवी अंबेकर, आणि ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे.. या परिसंवादाचे अध्यक्षपद भूषवत आहेत ज्येष्ठ माध्यमकर्मीं समीरण वाळवेकर..२० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता हा परिसंवाद होत आहे.. ‘युट्यूब’चे चालक, संपादक आणि पोर्टल चालकांसाठी आणि प्रिंट मधील मित्रांसाठी देखील.. अत्यंत महत्वाच्या या परिसंवादासाठी पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

 

 


Post a Comment

0 Comments