शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी -- तालुक्यातील आदर्श गाव चिलाणे येथे चिलाणे विकास मंच व ग्रामस्थांमार्फत विविध श्रेत्रांत यश प्राप्त झालेल्या गुणवंतांचा भव्य स्वरूपात सत्कार
करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंचचे अध्यक्ष सुरेश सोनवणे होते . यावेळी प्रमुख पाहुणे हस्ती बॅकेचे चेअरमन कैलास शेठ जैन , अॅड . बाळासाहेब पाटील , गावाच्या सरपंच योगीता गिरासे , माजी सरपंच दिलीप गिरासे माजी मुख्याध्यापक यु पी सोनवणे , एन टी गिरासे , जिजाबराव पाटील , माजी सभापती अरूण पाटील , राजाराम पाटील मा अभियंता अनिल पाटील , ज्ञान प्रसारक मंडळाचे हिमंत पाटील , ग्रा.प. सदस्य , विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी जगदीश परदेशी , कावेरी परदेशी , प्रशांत परदेशी , सचिन पाटील , दादाभाई मगरे , हिमत पाटील , दिनेश पाटील , रोहन पाटील , अशोक पवार , मंगलसिंग गिरासे , संतोष डिगराळे , सुरजसिंग गिरासे , संजय गिरासे , मनीष परदेशी , दिनेश पाटील , देवांग पाटील आदि मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाच्या प्रास्तावीक पर मनोगत व्यक्त करतांना प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी सांगितले की , गावातील विविध श्रेत्रात यश मिळविलेल्या गुणवंताचा सत्कार करणे महत्वाचे समजतो . प्रमुख अतिथी कैलास शेठ जैन यांनी विकास मंचचे व ग्रामस्थांचे कार्य अत्यंत अभिमानास्पद आहे . अँड. बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की , विकास मंचच्या माध्यमातुन सर्व लोक एकत्र आले . अध्यक्षीय भाषणात सुरेश यांनी विकास मंच्च्या माध्यमातून विविध कामे करण्याचा मानस व्यक्त केला . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाल्मिक पाटील यांनी केले . कार्यक्रमासाठी विकास मंचचे उपाध्यक्ष दिलीप गिरासे ,सचिव वसंत सोनवणे , खजिनदार अमोल पवार . सहसचिव पंढरीनाथ अहिरे , हसंराज पाटील , जगदीश परदेशी , प्रकाश न्हावी . सुधीर अडकमोल ' सुरेश भील आदिनी सहकार्य केले . शेवटी आभार विकास मंचे संग्रामसिंग राऊळ यांनी आभार मानले . कार्यक्रमास गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते .
0 Comments