Header Ads Widget

*भडणे येथील कार्तिक एकादशीनिमित्त पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांचे हस्ते,आरती*



      शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी --
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही विठ्ठल रुक्मणी मंदिर ट्रस्टच्या वतीने शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांचे हस्ते आरती करण्यात आली. कार्तिकी एकादशीला पंढरपूरला तर 


परिसरातील विखरण देवाचे येथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते ही परिसरातील पहिली यात्रा उत्सव असतो. भडणे गाव सुरुवातीपासून भाविकांचे गाव आहे म्हणून कोणत्याही प्रकारची दुःख प्रसंगी भाविक किर्तन व भजन कार्यक्रम आयोजित करतात.म्हणुन अशा गावांचा आदर्श तालुक्यातील इतर गावांनी घ्यायला हवा असे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी सांगितले.   यावेळी, भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील माझी प,सं सभापती विश्वनाथ पाटील माजी सरपंच पांडुरंग माळी विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र पाटील, उपसरपंच जगतसिंग गिरासे, गोपाल राऊळ,भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी, सतीश बागुल, आनंदा पाटील पुरुषोत्तम गोसावी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरवर्षी विखरण देवाचे द्वारकाधीश संस्थेचे अशोक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भडणे गावातील ज्येष्ठ वारकरी पांडुरंग माळी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी दिंडी घेऊन जातात. तसेच पंढरपूर व अष्टविनायक दर्शन बस यात्रा देखील नुकत्याच पार पडल्या. त्यातही भडणे गावातील भाविक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.



        

Post a Comment

0 Comments